Sakshi-Patil-Samruddhi-Patil
Sakshi-Patil-Samruddhi-Patil 
पश्चिम महाराष्ट्र

चाफळच्या पाटील भगिनींची कुस्तीत भरारी!

सकाळवृत्तसेवा

सातारा - त्या दोघी बहिणी शेतकरी कुटुंबातील. वडील, आजोबांनीही शेती करतानाच कुस्तीचा छंद जपला होता. हाच छंद त्यांना जडला अन्‌ त्या शालेय कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून यशाकडे झेपावू लागल्या. चाफळच्या साक्षी पाटील अन्‌ समृद्धी पाटील या आता विभागीय स्तरावर आपल्या चटकदार पकडीची चुणूक दाखविणार आहेत. गावच्या तांबड्या मातीत खेळणाऱ्या या भगिनी उत्तुंग भरारी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

साक्षी पाटील आणि समृद्धी पाटील या दोघी सख्ख्या चुलतबहिणी. साक्षीचे वडील प्रमोद पाटील आणि समृद्धीचे वडील संजय पाटील हे सख्ख्ये भाऊ. थोडे शिक्षण घेऊन दोघेही शेतीत गुंतले. मात्र, त्यांचे वडील, आजोबा हे जुन्या पिढीतील चांगले कुस्तीगीर होते. प्रमोद आणि संजय यांनीही गावच्या तालमीतील तांबड्या मातीतच कुस्ती जपली होती. ग्रामीण भागात मुलींनी कुस्ती खेळणे रुजलेले नव्हते; पण गेल्या काही वर्षांत शालेय कुस्ती स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळकरी मुली कुस्ती क्षेत्र गाजवू लागल्या. आपल्या मुलींनीही कुस्तीचे धडे गिरवावेत, असे प्रमोद आणि संजय पाटील यांना वाटत होते. त्यांनी मुलींना तांबड्या मातीत उतरवले. 

गावात ना व्यवस्थित तालीम, ना कोणत्याही सुविधा. प्रारंभी त्या मातीतच खेळू लागल्या; पण गावकऱ्यांनी गावात शाळेच्या एका खोलीत ‘मॅट’ उपलब्ध करून दिली. गावातील छोटे- मोठे कुस्तीगीर साक्षी, समृद्धी आणि इतर मुलींना आधुनिक कुस्तीचे डावपेच शिकवू लागले. प्रमोद पाटील आणि संजय पाटील यांनी स्वतः शेतीत राबत मुलींना काही कमी पडू दिले नाही. साक्षी आणि समृद्धीनेही कुस्तीत चुणूक दाखवायला सुरवात केली. शालेय कुस्ती स्पर्धांत त्या सहभागी होऊ लागल्या. गेल्या वर्षी साक्षीने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला. गावातील ती कुस्तीत जिल्ह्यावर यश मिळविणारी पहिली मुलगी होती. त्यामुळे गावकऱ्यांनी तिची जंगी मिरवणूक काढली होती. साक्षीला तिच्या वडिलांनी पुण्याच्या एका कुस्ती केंद्रात प्रशिक्षणासाठी ठेवली. तिने गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. 

तिचाच आदर्श घेत साक्षीची चुलत बहीण समृद्धी पाटील ही शालेय कुस्ती स्पर्धेत उतरली आणि तिनेही ५० किलो वजनी गटात जिल्ह्यात यश मिळविले. दोघीही बहिणी चटकदार कुस्त्यांसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध झाल्या. यावर्षी साक्षीने ४६ किलोगटातून, तर समृद्धीने ५० किलो गटातून जिल्ह्यात यश मिळविले आहे. दोघींचीही आता विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गावच्या तांबड्या मातीत खेळणाऱ्या या भगिनी उत्तुंग भरारी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT