पश्चिम महाराष्ट्र

बेडगमध्ये सापडला यादवकालीन शिलालेख

सकाळवृत्तसेवा

मिरज - जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासाची माहिती देणारा नवा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथील महादेव मंदिरात मिळाला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी त्याचा सखोल अभ्यास केला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवी सन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत आहे. आठशे वर्षांपूर्वीच्या या शिलालेखात मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी शिवमंदिराला दिलेल्या दानाची माहिती आहे.

मिरज इतिहास संशोधन मंडळातर्फे गेली काही वर्षे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास करताना सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात वीरगळ, सतीशिळा यावरील लेखांबरोबरच शिलालेख आणि ताम्रपट प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर करीत आहेत. या अभ्यासात त्यांना अनेक अप्रसिद्ध लेख मिळून 
आले आहेत. 

बेडगमधील राजवाड्यालगतच्या महादेव मंदिरात हा शिलालेख भिंतीमध्ये लावण्यात आला आहे. तीन फूट उंच आणि हळेकन्नड लिपीतील हा शिलालेख दोन टप्प्यांत आहे. सध्या त्याच्या २८ ओळी वाचता येतात. शिलालेखाच्या वरील भागात मध्यभागी शिवलिंग असून, त्याच्या एका बाजूला सूर्यचंद्र, नंदी आणि दुसऱ्या बाजूला गायींचे चित्र कोरले आहे. एक भक्त शिवलिंगाची पूजा करतानाही दाखविला.

या लेखात प्रारंभी देवगिरीचा यादव सम्राट दुसरा सिंघण याचा गौरव करणाऱ्या ओळी आहेत. माळवा, गुर्जर या देशातील राजांचा पराभव करणारा, होयसळ आणि तेलगू देशात वादळ माजविणारा प्रतापचक्रवर्ती सिंघण राजा देवगिरी येथे काव्य विनोदात सुखनैवपणे राज्य करीत असताना हा दान लेख दिला असल्याचे यात म्हटले आहे. हा दान लेख शके ११४४ चित्रभानू संवत्सर, कार्तिक शुद्ध प्रतिपदा यादिवशी म्हणजेच इसवी सन १२२२ मध्ये दिला. या लेखात सिंघण देवाचा सेनापती विक्रमदेव याचा उल्लेख आहे. या लेखामुळे सांगली जिल्ह्यावर आठशे वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादव राजांची सत्ता होती, हे स्पष्ट होते. या काळात सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची ‘वीरवणंज’ नावाची मोठी व्यापारी संघटना असल्याचेही या लेखावरून स्पष्ट होते. 

व्यापारास शेकडो वर्षांचा इतिहास
बेडगसारख्या छोट्या गावातही त्या काळात मोठ्या संख्येने व्यापारी आपल्या व्यापारातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग दान, धर्मासाठी खर्च करीत असल्याचे या लेखांवरून दिसून येते. मिरज इतिहास संशोधन मंडळ या लेखाचा अधिक अभ्यास करीत असून, त्यावरील निष्कर्ष लवकरच संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT