पश्चिम महाराष्ट्र

शेट्टी देशातील शेतकऱ्यांचे नेते

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - 'राजू शेट्टी हे एका मतदारसंघाचे नेते नाहीत, तर देशातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत. देशातील संसदेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे ते एकमेव खासदार आहेत. यावेळीही ते निवडून येणार यात शंका नाही,' असा विश्‍वास ज्येष्ठ राष्ट्रीय किसान राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रविकांत तुपकर आदी उपस्थित होते.

३ लाख मतांची आघाडी द्या
पहिल्या निवडणुकीत शेट्टी ९६ हजार मतांनी निवडून आले. दुसऱ्या निवडणुकीत १ लाख ७६ हजार मतांनी. यावेळी मात्र खासदार शेट्टी यांना ३ लाख मतांनी निवडून द्या. यातील १ लाख मते शेतकरीविरोधी असणाऱ्या मोदींना, १ लाख मते भाजप अध्यक्ष अमित शहा, तर १ लाख मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देण्याचे आवाहन योगेंद्र यादव यांनी केले.

श्री. यादव म्हणाले, ‘‘मोदी यांना देशातील अनेक लोकांनी पाठिंबा दिला; मात्र खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांना काय देणार, अशी विचारणा करून त्यांनी सत्तेला रामराम ठोकला. देशातील दोनशेपेक्षा अधिक शेतकरी संघटनांना एकत्र करून राष्ट्रीय संघटना बांधण्याचे काम खासदार शेट्टी यांनी केले.’’

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र अशा राजकारणाला आणि असे राजकारण करणाऱ्यांना अजिबात थारा देऊ नका. मी ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक लढवत आहे, परंतु कोणत्याही निवडणुकीत स्वत:चे पाच पैसेही खर्च झालेले नाहीत. प्रत्येक निवडणूक लोकवर्गणीतून लढलो आहे. सर्वसामान्यांनी रुपयांपासून काही लाखात निवडणूक निधी जमा होत आहे. या निवडणुकीसाठी आजपर्यंत लाख रुपये वर्गणी जमा झाली आहे; परंतु काही मंडळी चुकीचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘मोदी सरकार श्रीमंतांचे चोचले पुरवीत आहेत. सर्वसामांन्यासह सर्व घटकांची फसवणूक करीत आहेत.’’

माजी खासदार जयवंतराव आवळे, रामपाल जाट, योगेंद्र यादव, रविकांत तुपकर, मिश्रीलाल जाजू, भगवान काटे, उदय नारकर, डॉ. धनंजय माने, शशांक बावचकर, पी. जी. मांडरे, भवानीसिंह घोरपडे-सरकार यांचीही भाषणे झाली.

निधीचा पाऊस
सभेवेळी शेट्टी यांना निवडणूक निधी देण्यासाठी अक्षरशः रीघ लागली होती. बारामती येथील शेतकऱ्यांनी ५ लाख, कोले कुटुंबाने १ लाख ११ हजार यासह अनेकांनी निधी दिला, तर एका लहानग्याने खाऊचे पैसेही शेट्टी यांना निवडणुकीसाठी दिले.

सर्व शॉट खेळणार
आरोपांचे कितीही बॉल टाकले तरी टोलविण्यास सज्ज आहे. आता स्वीप, पूल, हेलिकॅप्टर शॉट ही मारण्यास तयार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT