Young man from village prepared dog belt to save from leopards! 
पश्चिम महाराष्ट्र

बिबट्यापासून बचाव करण्यासाठी तरुणाचा गावठी जुगाड !

शिवाजीराव चौगुले

शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा, जि. सांगली ) येथील भूषण पाटील या तरुणाने कुत्र्याचा बिबट्यापासून बचाव करण्यासाठी लोखंडी पट्टीला खिळे बसवून गळ्यात बांधण्यासाठी पट्टा तयार केला आहे. त्यामुळे कुत्र्याचा बिबट्यापासून बचाव होईल. त्याच्या या गावठी जुगाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे घरचा रखवालदार कसा वाचवायचा हा प्रश्न सर्वांना पडल्याने अशा वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवण्याची वेळ आली आहे. 
शिराळा तालुक्‍यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गावात बिबट्याचे दर्शन, पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडत आहेत. तालुक्‍यातील अनेक गावांतील कुत्री बिबट्याने फस्त केली असल्याने कुत्र्यांची संख्या घटू लागली आहे.

तालुक्‍यातील बहुतांशी शेतकरी हे वस्तीवर असतात. त्यासाठी राखणदार म्हणून कुत्री पाळली जात आहेत. मात्र सध्या बिबट्याचे मोठ्या प्रमाणात प्रस्त वाढले असल्याने पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले होऊ लागले आहेत. त्यात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात बळी गेला आहे. 


अंत्री येथे जवळपास 9 कुत्री बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. आता असणारी कुत्री कशी वाचवायची हा प्रश्न पडला आहे. त्यासाठी अंत्रीच्या भूषण पाटील या युवकाने लोखंडी पट्टीला खिळे बसवून गळ्यात बांधण्यासाठी पट्टा तयार केला.

बिबट्या शक्‍यतो मान पकडत असल्याने मानेला असणाऱ्या पट्टयाला खिळे असल्याने कुत्र्याचा बचाव होईल. त्यासाठी त्याने हे गावठी जुगाड केले आहे. या जुगडची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT