crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

जत: युवतीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीस पुण्यातून अटक   

सकाळवृत्तसेवा

माडग्याळ : जत तालुक्‍यातील संख येथील युवतीवर बलात्कार करून खून करणारा नराधमास उमदी पोलिसांनी पुणे येथील भोसरी एमआयडीसीमध्ये मुसक्‍या आवळल्या.

श्रीशैल्य शिवगोंडा ढासाळ (वय 20) या नराधमाचे नाव असून  पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने त्याला अटक केली.  जत तालुक्‍यातील संख येथे एका 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला. संखपासून दीड किलोमीटरवरील वस्तीमध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तिघा संशयितांना उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला होता. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

शुक्रवारपासून गावातील एक तरुण फरारी आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. याचा शोध घेण्यासाठी उमदी पोलिसांनी तिन पथके तयार केली होती. या खूनामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? या दिशेने पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करीत होते. फरारी तरूणाचा शोध घेत पोलिसांनी सोलापूरपर्यंत या तरूणाचा मार्ग काढला.

सोलापूरमध्ये चौकशी केली असता हा तरूण पुणे येथे असल्याचे कळाले. पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. फरारी तरूण भोसरी येथे एमआयडीसीमध्ये कामास जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी त्या ताब्यात घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT