पश्चिम महाराष्ट्र

कोरेगावात ‘एक तालुका, एक गणवेश’

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव - तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांसाठी पंचायत समिती स्तरावर ‘एक तालुका, एक गणवेश’चे धोरण निश्‍चित झाले असून, ‘ड्रेसकोड’चा ‘कोरेगाव पॅटर्न’ आकारास आल्याने यापुढे तालुक्‍यातील १८४ शाळांतील सर्वच सुमारे ११ हजार विद्यार्थी एकाच ड्रेसकोडमध्ये दिसतील. 

पूर्वी विद्यार्थ्यांसाठी खाकी व पांढरा आणि विद्यार्थिनींसाठी निळा व पांढरा गणवेश होता. काही वर्षांपूर्वी त्यात थोडासा बदल झाल्यानंतर खाकीची जागा निळ्या रंगाने घेतली. दरम्यान, ठिकठिकाणी खासगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊ लागल्या. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा रंगीत गणवेश पालकांसह विद्यार्थ्यांनाही आकर्षित करू लागल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. गावपातळीवर शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आली आणि शासकीय अनुदानाबरोबरच या समितीला स्थानिक पातळीवर काही अधिकारही मिळाले. या अधिकाराचा वापर करून काही प्राथमिक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेसारखा गणवेश देण्यास प्रारंभ केला. तालुक्‍यामध्ये सर्वप्रथम २०१४ मध्ये पवारवाडी येथील प्राथमिक शाळेत हा प्रयोग राबवण्यात आला. त्यानंतर अन्य शाळांनीही हाच कित्ता गिरवायला सुरवात केली. त्यामुळे प्रत्येक शाळेत ‘एक शाळा, एक गणवेश’ असे चित्र दिसू लागले. 

दरम्यान, स्पर्धा अथवा अन्य कारणांसाठी विविध शाळा एकत्र आल्यानंतर गणवेशामध्ये एकसारखेपणा दिसत नव्हता. या पार्श्‍वभूमीवर ‘एक शाळा, एक गणवेश’ऐवजी ‘एक तालुका, एक गणवेश’ची संकल्पना पुढे आली. त्यासाठीचे धोरण निश्‍चित करण्यासाठी सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बजरंग वाघ, सरचिटणीस प्रमोद देशमुख, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय लेंभे, सरचिटणीस संतोष मांढरे व सहकाऱ्यांची बैठक झाली. त्यात झालेल्या विचारविनिमयानंतर ‘ड्रेसकोड’चा ‘कोरेगाव पॅटर्न’ आकारास आला आहे. त्यानुसार, येत्या १५ ऑगस्टपासून तालुकाभर नवीन ड्रेसकोड अंमलात आणण्यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व शिक्षकांची जोरदार तयारी सुरू आहे.

ड्रेसकोडचा सकारात्मक परिणाम - जगदाळे
खासगी शाळांमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना आकर्षक ड्रेसकोड देण्याची प्रथा चार-पाच वर्षांपूर्वीच सुरू झाली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने ड्रेसकोडसाठी ‘एक शाळा’ऐवजी ‘एक तालुका’, धोरण स्वीकारले आहे, अशी माहिती सभापती रामभाऊ जगदाळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT