पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात झेडपीच्या राजकीय जुळवाजुळवीला वेग

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदी आपलाच माणूस विराजमान करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप सरसावला आहे. दोन्ही पक्षांच्या बैठका आज सोलापुरात झाल्या. या निवडी मंगळवारी (ता. 31) होणार असून येत्या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 


लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले अनेक नेते आज महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्रित आल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीकडे इच्छुक अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे आली आहेत. भाजपने अद्यापही या दोन्ही पदांसाठी नावे निश्‍चित केली नाहीत.

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आणि संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या निवडीत काय भूमिका घेतात? यावर महाविकास आघाडी आणि भाजपचे राजकीय गणित अवलंबून आहे. महाविकास आघाडीने आपल्यासोबत 40 सदस्य असल्याचा दावा केला असून सदस्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT