पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 11 रुग्णांचा मृत्यू, तर 1105 नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग झाल्याने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 11 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात तीन महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण 850 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात आज 1105 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 45 हजार 510 झाली आहे. आज 727 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 863 झाली आहे. सध्या 12 हजार 797 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज मयत झालेल्या व्यक्ती निगडी (पुरूष वय 84), मोशी (स्त्री वय 65), सांगवी (स्त्री वय ५४, पुरुष वय 72, पुरुष वय 79), दापोडी (पुरुष वय 83), रावेत (पुरुष वय 65), भोसरी (पुरुष वय 54, स्त्री वय 68), पिंपरी (पुरुष वय 83), तळेगाव (पुरुष वय 56) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT