पिंपरी-चिंचवड

मावळात दोन वृद्ध महिलांना कोरोनाची लागण

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : आंदर मावळातील माऊ येथे एक 80 वर्षीय तर पवन मावळातील कडधे येथे एक 70 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. एकाच दिवशी दोन रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

माऊ येथील महिला अंधेरीवरून आली होती. लक्षणे आढळल्याने तिला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. तिच्यावर तळेगाव येथील मायमर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या नजीकच्या संपर्कातील सात व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कडधे येथे आढळलेल्या ७० वर्षीय महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या नजीकच्या संपर्कातील आठ व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कडधे येथे सोमवारी एक ४५ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तालुक्यात आत्तापर्यंत  २० कोरोना रुग्ण आढळले असून उपचारानंतर त्यातील १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ऊर्से येथील संशयित ३२ वर्षीय तरुणाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. लक्षणे आढळल्याने त्याचा स्वॅब बुधवारी तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT