पिंपरी-चिंचवड

बापरे! मावळात आज कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात रविवारी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा कहर झाला. एका दिवसात उच्चांकी २८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सुदुंबरे येथील एकाच कुटुंबातील सोळा, कान्हे फाटा येथील एकाच कुटुंबातील चार, वडगाव व साई येथील प्रत्येकी दोन तर इंदोरी, कामशेत, तळेगाव व लोणावळा येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकाच दिवसात २८ रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार होऊन २२० झाली आहे. त्यात शहरी भागातील ८०, तर ग्रामीण भागातील १४० जणांचा समावेश आहे. तळेगाव येथील सर्वाधिक ५९, लोणावळा येथील १६ तर वडगाव येथील रुग्ण संख्या सहा झाली आहे. आतापर्यंत  नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८८ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, तर ४० जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.    

दरम्यान, रविवारी आढळलेले बहुतेक रुग्ण हे अगोदर पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आहेत. सुदुंबरे येथे आढळून आलेले सर्व १६ जण एकाच कुटुंबातील आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. कान्हे येथील चौघे जणही अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या ५० वर्षीय पुरुषाची पत्नी व तीन मुले आहेत. साई येथे पॉझिटिव्ह आलेल्या २९ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील २० वर्षीय पुरुष व ८० वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लोणावळा येथील ३९ वर्षीय व कामशेत येथील एका ४८ वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

वडगाव येथील एका मोठ्या हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या व कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इंदोरी येथील एका ४२ वर्षीय महिलेचा, तळेगाव येथील एका २६ वर्षीय पुरुषाचा, कामशेत येथील एका ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी आढळलेले बहुतेक सर्व रुग्ण अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे बहुतेक जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. लोहारे यांनी दिली.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT