Commissioner Shekhar Singh sakal
पिंपरी-चिंचवड

General Tax : सामान्य करात महिलांना ३० टक्के सवलत; महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती

महिलांच्या नावावरील निवासी मिळकतींच्या सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महिलांच्या नावावरील निवासी मिळकतींच्या सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. माजी सैनिकांना १०० टक्के सवलत आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांनी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. नागरिकांना ३० जूनपर्यंत मिळकतकर सवलत मिळणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जमिनी, मिश्र अशा सहा लाख २८ हजार मिळकती आहेत. त्यांचा घरबसल्या भरणा करता येण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत. ३० जूनपर्यंत करभरणा केल्यास विविध सवलती जाहीर केल्या आहेत. एक एप्रिलपासून आतापर्यंत एक लाख ८१ हजार ९६८ मिळकतधारकांनी दोनशे कोटी ३९ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे.

पर्यावरणपूरक हाउसिंग सोसायट्यांना तसेच, कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना पाच ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. त्याचबरोबर ग्रीन बिल्डिंग रेटिंग तीन ते पाच रेटींगपर्यंत पाच ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २५ टक्के मिळकतधारकांनी दोनशे कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे. तसेच ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींचा मिळकतधारकांनी लाभ घ्यावा. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

अशी मिळेल करसवलत

  • मिळकत प्रकार / सवलत (टक्क्यांत)

  • आगाऊ करभरणा / ५

  • महिलांच्या नावे निवासस्थान / ३०

  • ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व / ५०

  • स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नीचे निवासस्थान / ५०

  • ऑनलाइन कराचा भरणा ३० जूनपर्यंत केल्यास / ५

  • जुलै ते सप्टेंबरअखेर पर्यंत भरणा केल्यास / ४

  • माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत स्वयंस्फूर्तीने मिळकतीची नोंदणी केल्यास / ५

  • इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास / २

  • संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात / १००

  • नवीन नोंद होणाऱ्या मिळकतींच्या सामान्य करात / ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT