पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जास्त

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मागील चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटत असून, शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी (ता. 4) 629 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर तब्बल 900 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात सोळा जणांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण रुग्णसंख्या 24 हजार 311 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आठवड्यापूर्वी दररोजच्या कारोना रुग्णांचा आकडा हजाराच्यावर गेला. यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र, मागील चार दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शुक्रवारी 913, शनिवारी 903, रविवारी 797, तर सोमवारी 748 नवीन रुग्ण आढळले. मंगळवारी (ता. 4) तर रुग्णांची संख्या आणखीच घटली. दिवसभरात 629 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह मंगळवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंगळवारी मृत्यू झालेल्यांमध्ये आकुर्डीतील 79 वर्षीय पुरुष, चिंचवडमधील 86 वर्षीय महिला, निगडीतील 66, 72 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 47 वर्षीय महिला, पिंपळे गुरवमधील 98 वर्षीय पुरुष, किवळे येथील 70 वर्षीय पुरुष, भोसरीतील 68 वर्षीय पुरुष, पिंपळे सौदागर येथील 43 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 54 वर्षीय पुरुष, भोसरी, इंद्रायणीनगर येथील 74 वर्षीय पुरुष, मोशीतील 59 वर्षीय पुरुष, सांगवीतील 77 वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील 35 वर्षीय पुरुष, देहूरोडमधील 65 वर्षीय पुरुष व म्हाळुंगे येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

आजचा वैद्यकीय अहवाल 
* दाखल झालेले संशयित रुग्ण - 929 
* पॉझिटिव्ह रुग्ण - 629 
* निगेटिव्ह रुग्ण - 300 
* चाचणी अहवाल प्रतीक्षेतील रुग्ण - 1520 
* रुग्णालयात दाखल एकूण संख्या - 3783 
* डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण - 1690 
* कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - 900 
* आजपर्यंत मृत्यू - 505 
* आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या - 17106 
* दैनंदिन भेट दिलेली घरे - 23481 
* दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - 77245 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT