पिंपरी-चिंचवड

मावळवासीयांनो सावधान! आज पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस  कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल ६५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्यात तळेगाव येथील उच्चांकी ३३ जणांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ९७९ वर पोचली आहे. मात्र, त्यातील ६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ६५  जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ३३,  लोणावळा येथील सात, वडगाव येथील पाच, टाकवे बुद्रुक व वराळे येथील प्रत्येकी चार,  कामशेत, इंदोरी, जांभूळ व गहुंजे येथील प्रत्येकी दोन; तर तळेगाव दाभाडे ग्रामीण, कान्हे, शिरगाव व साते येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९७९ झाली असून, हजाराच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. त्यात शहरी भागातील ४८२, तर ग्रामीण भागातील ४९७ जणांचा समावेश आहे. तळेगावात रुग्ण संख्येचा ओघ सुरूच असून, तेथे सव्वा तीनशेचा टप्पा गाठला आहे. लोणावळा येथे ९१, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ६६ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी ६५ % एवढी आहे. आतापर्यंत ६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी ६६ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३३१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २३२ जण लक्षणे असलेले, तर ९९ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २३२ जणांमध्ये १७४ जणांमध्ये सौम्य, तर ४७  जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १० जण गंभीर व एक जण अत्यवस्थ आहे. सध्या २८३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, ४८ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT