Morning walk Google File photo
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत मॉर्निंग वॉक करणारे 37 पॉझिटिव्ह, पोलिसांची कारवाई

विकेंड लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकेंड लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच या दोन्ही शहरांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजे काळी बुरशी (Black fungus) या आजाराने ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शासन, प्रशासन खडबडून जागे झालं आहे. (70 morning walkers fined and 37 positive cases found in Pimpri)

कोरोना आणि म्युकरमायकोसिस या दोन्ही महामारींना रोखण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक तसेच लॉकडाउनच्या नियमांचे सक्तीने पालन करण्यावर भर द्यायला सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता.२२) मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी ७० पैकी ३७ नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मॉर्निंग वॉकनिमित्त रस्त्यांवर फिरणाऱ्या या सर्व ७० नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी ३७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. विकेंड लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात आली नसल्याने शासनाकडून निर्बंध आणखी कडक करण्यात येत आहेत. मृतांची संख्या वाढत चालली आहे. असे असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पिंपरीतील मोशी प्राधिकरण, पीसीएनटीडीए सर्कल, मोशी, भोसरी येथील नागरिक शनिवारी मॉर्निंग वॉकनिमित्त घराबाहेर पडले. यावेळी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या नागरिकांवर कारवाई केली.

पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शहरातील १२ ठिकाणी नाका बंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी ५९३ दुचाकी चालकांचीही चौकशी करण्यात आली. त्यापैकी काही दुचाकी चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चाफेकर चौक आणि जमतनी चौक दुचाकी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, गुन्हे शाखेचे प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल डेरे, दिनेश मुंडे, जयदीप खांबट, सागर कोळी, पुना हगवणे आणि सुनील कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच नागरिकांना कोरोना रोखण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

पिंपरी-चिंचवडमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate will be arrest : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : कायद्यापुढे कोणीही मोठं नाही; आमच्या सरकारने हे प्रत्यक्ष दाखवून दिलं – रावसाहेब दानवे

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT