police
police sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : आरोपी व पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे गुरव येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या पथकावर आरोपींनी गोळीबार केला. या चकमकीत तीन आरोपीनी पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. तर, पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. या चकमकीत पळून जाणाऱ्या आरोपींच्या अंगावर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकल्याने तिनही आरोपी खाली पडले. त्यानंतर पथकातील इतर पोलिसांनी तात्काळ झडप घालून आरोपींना ताब्यात घेतले. खेड तालुक्यातील कोये-कुरकुंडी येथे सुमारे अर्धा तास ही चकमक सुरु होती. (accused and the police opened fire)

गणेश हनुमंत मोटे (वय २३), महेश तुकाराम माने (वय २३, दोघे रा. कवडेनगर, सांगवी), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २१, रा. विनायकनगर, नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व एक काडतुस जप्त करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त मंचक इप्पर व आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात १८ डिसेंबरला सकाळी दहाच्या सुमारास योगेश जगताप या सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून खून झाला. याप्रकरणात पोलिसांनी यापूर्वी एका अल्पवयीन आरोपीसह गणेश ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश सकपाळ, अक्षय केंगले, अभिजित वारे, मुज्जमील आतार या सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतुसे जप्त केली आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार होते. वारंवार आपले लोकेशन बदलून एकमेकांच्या संर्कासाठी इंस्टाग्रामचा वापर करत असल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश येत नव्हते. दरम्यान, तिन आरोपी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोये-कुरकंडी गावात फिरत असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांना मिळाली. याचवेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे एटीएम फोडीच्या एका तपासासाठी आळंदी येथे आले होते. ही माहिती मिळताच पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार चार पथके तयार करून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिस आयुक्तही यावेळी उपस्थित होते.

कोये येथे शेताच्या कडेला एका घराशेजारील झाडीत दुचाकी दिसून आली. त्यानंतर त्या घराची रेकी केली असता घरात तीन जण असल्याचे स्पष्ट झाले.मात्र, आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जात असताना पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. त्यावेळी गणेश व अश्विन यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून पोलिसांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनीही आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र, आरोपी हाती लागले नाही. यानंतर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथील एक झाड उचलून ते पळून जाणाऱ्या आरोपींच्या अंगावर फेकले. यात तिनही आरोपी खाली पडले. त्यांनतर इतर पोलिसानी झडप घालून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. रविवारी (ता. २६) रात्री सव्वाअकरा ते पावणेबारा अशी अर्धा तास ही चकमक सुरु होती. या गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. दरम्यान, आरोपींना पकडताना पोलिस आयुक्तांना खरचटले. तर पाठलाग करताना चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

आरोपींकडे पिस्तूल तर पोलिस आयुक्तांकडे झाड

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकून त्यांना ताब्यात घेतले. मात्र, आरोपींकडे पिस्तुल असताना पोलिस आयुक्तांनी झाड फेकून आरोपीना पकडणे, हे मोठे जोखमीचे होते. यामध्ये त्यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचाही जीवाला धोका निर्माण झाला असता. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी उचललेले हे झाड आरोपींना पकडण्यासाठी वापरण्यात आल्याने पुरावा म्हणून चाकण पोलिस ठाण्यात आणून ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT