The accused vandalism vehicle were taken to the same place by the police for reiki 
पिंपरी-चिंचवड

नेहरुनगरमध्ये दहशत पसरविणाऱ्यांची पोलिसांनी काढली 'धिंड'; तलवार, कोयत्याने केली होती वाहनांची तोडफोड

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : तरूणावर प्राणघातक हल्ला करीत शंभर जणांच्या टोळक्‍याने शुक्रवारी (ता.30) पिंपरीतील नेहरूनगर येथे तलवार, कोयते, लाकडी दांडक्‍याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ज्या ठिकाणी या टोळक्‍याने दहशत माजविली त्या परिसरात पिंपरी पोलिसांनी या टोळक्‍यातील आरोपींना मंगळवारी (ता.3) पायी फिरवलं. चार दिवसांपूर्वीच परिसरात धूडगूस घालणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पाहून स्थानिकांनी सुस्कारा सोडला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आशिष जगधने (वय 31), इरफान शेख (वय 30), जितेश मंजुळे (वय 28), जावेद औटी (वय 29), आकाश हजारे (वय 30) यांच्यासह वीस जणांना अटक केली आहे. तर चौदा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर नीलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल आहे.

दारुच्या नशेत झाला किरकोळ वाद; फावड्याच्या दांडक्याने केला डोक्‍यात वार

दरम्यान, अटक केलेल्या आरोपींपैकी पाच आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी नेले. नेमकी घटना कशी घडली, टोळके कोणत्या दिशेने आले, कुठे-कुठे फिरले, कोणत्या दिशेने निघून गेले आदी माहिती आरोपींकडून घेण्यात आली. तसेच गुन्ह्यातील हत्यारे जप्त करण्यात आली. पोलिसांनी या घटनेत 17 वाहने जप्त केली आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT