pawana dam
pawana dam sakal
पिंपरी-चिंचवड

पवना धरणात सध्या शिल्लक ४० टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या धरणात चाळीस टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो सहा टक्क्यांनी कमी आहे.

पवनानगर - यंदा उष्णतेच्या झळा (Heat Waves) तीव्र झाल्याने पवना धरणांमधील (Pawana Dam) पाण्याची मागणी (Water Demand) वाढली आहे. सध्या धरणात चाळीस टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो सहा टक्क्यांनी कमी आहे. सध्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा (Water Supply) केला जात आहे. येत्या काही दिवसांत धरणांमधील पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली जाण्याची शक्यता आहे. पवना धरणातील पाण्याचा वापर शेतीसह मावळ आणि पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना पिण्यासाठी होतो.

पवनाधरणात ४० टक्के पाणीसाठा

पवना धरणात आजमितीला ३९.४० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.५१ टीएमसी आहे. पवनाची पाणी पातळी ६०५.१५ मीटर असून, सध्या पवना धरणात ९४.९७ मीटर उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजअखेर ४५.०८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात सहा टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच धरण १०० टक्के भरले होते. परंतु वाढते तापमान व पाण्याची वाढती मागणी या बाबींचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.

मागील चार महिन्यांचा विचार केला तर या तीन ते चार महिन्यांत ३० टक्के पाणीसाठा कमी झाला असल्याचे दिसून येते. अजूनही उन्हाळा संपायला दीड ते दोन महिने बाकी आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. पवना धरणातून वीजनिर्मिती केंद्रातून रोज सहा तास १२०० क्युसेकने पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी सोडण्यात येते.

चार महिन्यांची टक्केवारी

एप्रिल २०२२ - ३९

मार्च २०२२ - ५०.२३

फेब्रुवारी २०२२ - ५८.६५

जानेवारी २०२२ - ७०.१६

दोन वर्षांचा पाणीपुरवठा

एप्रिल २०२१ ( ४५.०८ टक्के)

एप्रिल २०२० (४९.१२ टक्के)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT