Beating Sakal
पिंपरी-चिंचवड

‘तुझ्या मुलाला माज आला आहे,’ असे म्हणत टोळक्याने आई व मुलांना केली मारहाण

‘तुझ्या मुलाला माज आला आहे,’ असे म्हणत टोळक्याने आई व दोन मुलांना शिवीगाळ करीत तलवारीने मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘तुझ्या मुलाला माज आला आहे,’ असे म्हणत टोळक्याने आई व दोन मुलांना शिवीगाळ करीत तलवारीने मारहाण केली. तसेच तलवार नाचवत ‘आमच्या गँगशी कोणी पंगा घेतला तर संपवून टाकू’ अशी धमकी दिली. ही घटना पिंपरीतील बौद्धनगर येथे घडली.

प्रकाश राम (वय २६), अमित सौदे (वय २२), ओमकार (वय २१), चंदन बिहारीराम (वय २३), सनी दुसीया यांच्यासह तीन महिला अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. १६) रात्री पावणे अकराच्या सुमारास अमित व ओंकार या दोघांनी फिर्यादीला ‘तुझा मुलगा कुठे आहे,’ असे विचारले. त्यावर ‘तू शिवी का देतोस,’ असे फिर्यादीने विचारताच आरोपी ‘तुझ्या मुलाला माज आला आहे. तो आता प्रकाश राम सोबत राहत नाही’ असे म्हणाले. दरम्यान, आरोपी अमित याने त्याच्याजवळील तलवार काढली.

फिर्यादी महिलेने त्यांचा मुलगा अजय याला फोन करून बोलावले. तो घरी येताच आरोपी अमित, ओमकार हे त्याला मारहाण करू लागले. अमित याने अजयच्या पाठीत तलवार मारली असता तो घाबरून पळाला. त्यानंतर आरोपी हे फिर्यादीच्या घरात शिरले. फिर्यादीला व त्यांच्या मुलीलाही मारहाण केली. अमितने महिलेच्या उजव्या हातावर व पायावर तलवार मारली. त्यानंतर आरोपी प्रकाश, अमित हे हातात तलवार घेऊन नाचत होते. ‘आमच्या गँगशी कोणी पंगा घेतला तर संपवून टाकू’, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या मुलाला मारण्याची धमकी देत त्याच्या पाटीवर तलवार मारली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT