Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
पिंपरी-चिंचवड

बेस्ट सिटीची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा

रमेश मोरे

जुनी सांगवी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाच्या राजवटीत भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहेत. ज्यांच्याकडे पालिकेची सूत्रे आहेत त्यांचे टेंडर काढणे जवळच्या माणसाला टेंडर कसे मिळेल हे पाहणे रिंग करण्यात लक्ष. महापालिकेच्या इतिहासामध्ये स्थायी समिती अध्यक्षाला लाच प्रकरणी अटक होण्याची वेळ कधी आली नव्हती. पण, भाजपच्या स्थायी अध्यक्षाला अटक झाली त्यातून शहराची बदनामी झाली हे शहरवासीयांनी लक्षात घ्यावे. असे आवाहन उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपळे गुरव येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात बोलताना सांगितले.

भाजपच्या राजवटीत शहर विकासात मागे पडले नियोजन नाही पवना धरण भरले असतानाही दिवसाआड पाणी मिळत असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शहरातील नागरिकांनी पक्षाला ताकद दिली. पक्षाची सत्ता असताना सर्वांना विश्वासात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास केला. वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन रस्ते प्रशस्त केले फ्लायओवर वे क्रीडांगणे केली देश जगाच्या पातळीवर शहराचे नाव पोचवले. मात्र, २०१७ मध्ये खोट्या भूलथापांना बळी पडून नागरिकांनी त्यांच्याकडे पालिकेची सूत्रे दिली. तेव्हापासून शहराचा विकास मागे पडला असे पवार यांनी सांगितले. केवळ नमामी गंगे म्हणून नदी स्वच्छ होते का? याचबरोबर लाचखोरी प्रकरणामुळे शहराची बदनामी झाली. शहरातील नागरिकांनी अशा प्रकारच्या लोकांना कसे निवडून दिले. राष्ट्रवादीची सत्ता चांगली होते असे नागरिक आता बोलून दाखवत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची बेस्ट सिटीची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करावे. समोर निवडणुका आहेत.याकाळात ईकडून तिकडे तिकडून इकडे येणारे जाणारे असतातच. मात्र, कार्यकर्त्यात निवडून येण्याची क्षमताही असली पाहिजे.एकमेकांच्या पायात पाय न घालता सर्वांनी एकदिलाने काम करावे.

ते पुढे बोलताना म्हणाले, मतं मिळविण्यासाठी भाजपाकडून भुलथापा देण्याचे काम झाले. हे शहरातील नागरिकांना आता ज्ञात झाले आहे. ते कार्यकर्त्यांनी पटवून दिले पाहिजे.एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे राजकारण करू नका. झाले गेले मागचे विसरून कामाला लागा. आपआपल्या भागात कामाला सुरुवात करा. शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्राधिकरणाचा बराचसा भाग महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आला आहे. वेगवेगळी यंत्रणा असण्यापेक्षा एकच यंत्रणा निट राबविल्यास शहराचा विकास होईल. विकासाच्या दृष्टीने एकच यंत्रणा असणेकधीही चांगले. सगळ्या घटकांना संधी देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करते. यात गाववाला, बाहेरचा असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कधीही केला नाही. मी बोललेले काही जणांना पोचते पण माझे बोलणे समाजहिताचे असते. तर एकमेकांच्या पायात पाय न घालता राजकारणात कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरी त्या मैत्रीला एक मर्यादा असली पाहिजे अशामुळे त्याचा फटका काम करणा-या कार्यकर्त्यांना बसतो असेही खडे बोल कार्यकर्त्यांना सुनावले.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत विविध सत्रात कार्यकर्ता मार्गदर्शन व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. यात पहिल्या सत्रात प्रा.हरि नरके यांनी ओबीसी आरक्षण व दिशाभूल या विषयावर मार्गदर्शन केले. दुस-या सत्रात विजय चोरमारे यांनी समग्र शरद पवार या विषयावर मार्गदर्शन केले. पार्थ पोफळे यांनी भाजपा सत्तेत का नको या विषयावर कार्यकर्त्यांनी संवाद साधला. तर सनदी अधिकारी महेश झगडे यांनी शहरी प्रश्न व नागरिकरण या विषयावर मार्गदर्शन केले. प्रविण गायकवाड यांनी मराठा व इतर राजकीय आरक्षणे या विषयावर मार्गदर्शन केले. तर शशिकांत शिंदे यांनी भाजपा सत्ता काळातील जुलमी कायदे व धोरणे या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फजल शेख, अरूण बो-हाडे यांनी केले. संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आ. विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, शमीम पठाण, राजेंद्र जगताप, मंगला कदम, मयुर कराटे आदींसह सर्व सेलचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT