BRT Line Bus Sakal
पिंपरी-चिंचवड

‘बीआरटी’त घुसखोरीला बसणार आता चाप!

पीएमपी बसचा ‘बीआरटी’मधला प्रवास अधिक वेगाने व विना अडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी ‘बूम बॅरियर’ बसविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पीएमपी बसचा ‘बीआरटी’मधला प्रवास अधिक वेगाने व विना अडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी ‘बूम बॅरियर’ बसविण्यात येत आहे.

पिंपरी - पीएमपी बसचा ‘बीआरटी’मधला प्रवास अधिक वेगाने व विना अडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी ‘बूम बॅरियर’ बसविण्यात येत आहे. पैकी १२ ठिकाणी बॅरियरला कॅमेऱ्यासह (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नायझेशन) यंत्रणा बसविली आहे. उर्वरित ठिकाणीदेखील लवकरच यंत्रणा बसविली जाईल.

‘पीएमपी’च्या बसचे यासाठी सुमारे पन्नास हजार छायाचित्र सर्व्हरमध्ये लोड केले आहेत. त्यामुळे पीएमपी बस व्यतिरिक्त अन्य वाहने बीआरटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना प्रवेश करता येणार नाही. जबरदस्तीने अथवा बॅरियरचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या वाहनांचे फोटो तत्काळ वाहतूक पोलिसांकडे जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता येणार आहे. पीएमपी प्रशासनाने पायलट प्रोजेक्टअंतर्गत शहरात १२ ठिकाणी बूम बॅरियर सुरू केले. मात्र, मधल्या काही महिन्यांत त्याचे नुकसान झाल्याने ते बंद केले. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने बीआरटीमध्ये घुसणाऱ्या वाहनांचा कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी घुसखोरी करणाऱ्या वाहनांचे फोटो पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व १४८ ठिकाणी बूम बॅरियर बसविले जातील.

हे कसे काम करेल

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २०१६ बस आहेत. या सर्व बसचे सर्व बाजूने सुमारे चाळीस ते पन्नास हजार फोटो काढून सर्व्हरला जमा केले आहेत. बॅरियरच्या ठिकाणी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नायझेशन ही यंत्रणा बसविण्यात आली. कॅमेऱ्याच्या कक्षात जेव्हा वाहन येईल, तेव्हा त्याचे फोटो काढून सर्व्हर आपल्याजवळच्या बसच्या फोटोशी तुलना करेल. यात नंबर प्लेटसह अन्य बाबी पहिल्या जातील. हे सर्व एक ते दोन सेकंदांत घडेल. नोंदलेल्या नंबर प्लेटची बस असल्यास बॅरियर खुले होईल. अन्य वाहने आल्यास बॅरियर उघडणार नाही. तसेच, रेड अलार्म देऊन त्याचा फोटो तत्काळ वाहतूक पोलिसांकडे जाईल.

सद्यःस्थिती काय?

  • १० लाख - पीएमपीचे रोजचे सरासरी प्रवासी

  • १ कोटी ३५ लाख - पीएमपीचे रोजचे सरासरी उत्पन्न

  • ११ लाख - कोरोनापूर्व काळातील रोजची प्रवासी संख्या

  • १.५ कोटी - कोरोनापूर्व काळातील रोजचे उत्पन्न

या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट

जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डेक्कन कॉलेज व विश्रांतवाडी चौक येथील साठे बिस्कीट, तसेच काळेवाडी ते स्पाइन रोडवरच्या बीआरटी मार्गावर आठ ठिकाणी बॅरियर बसविण्यात आले.

हे आहेत बीआरटी मार्ग

स्वारगेट-कात्रज, संगमवाडी-विश्रांतवाडी, येरवडा-आपले घर, सांगवी-किवळे रोड, निगडी-दापोडी, काळेवाडी फाटा-स्पाइन रोड व दिघी-आळंदी आदी मार्गावर १४८ बॅरियर बसविले जाणार आहेत.

पीएमपीच्या सर्व बीआरटी मार्गांवर १४८ बूम बॅरियर बसविले जाणार आहेत. सध्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत १२ ठिकाणी बॅरियर बसविण्यात आलेत. यामुळे बीआरटीमधील घुसखोरीला चाप बसेल.

- राजेश रूपनवर, व्यवस्थापक, बीआरटी, पीएमपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT