Talera Hospital sakal
पिंपरी-चिंचवड

Talera Hospital : तालेरा रुग्णालयात ‘बर्न वॉर्ड’ची प्रतीक्षा

एखाद्या दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला १५ मिनिटांच्या आत उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे, शहरात किमान एक तरी जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) असणे अत्यावश्‍यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - एखाद्या दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला १५ मिनिटांच्या आत उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे, शहरात किमान एक तरी जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) असणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, उद्योगनगरी बिरुद मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका रुग्णालयांत असा जळीत रुग्ण उपचार कक्षच नाही.

त्यामुळे, रूग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे, चिंचवड येथील जुन्या तालेरा रुग्णालयातील नियोजित जळीत रूग्ण उपचार कक्षासाठी महापालिकेने ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासोबतच थेरगाव, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, सांगवी, यमुनानगर, पिंपरी या सात ठिकाणी महापालिकेची रुग्णालये आहेत. मात्र, सध्याच्या घडीला यातील एकाही रुग्णालयात बर्न वॉर्ड अथवा जळीत कक्ष नाही. त्यामुळे, आगीच्या घटनांमधील जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्या पार्श्वभूमीवर, शहराला सुसज्ज जळीत रुग्ण उपचार कक्ष असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने पुढे येत आहे.

जळीत रुग्णावर उपचारास मर्यादा

शहरासह परिसरात कारखाने आणि लहान-मोठ्या उद्योगांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, रोजगारासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर कामगार आले आहेत. कारखान्यांसह निवासी व व्यापारी भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील जखमींना उपचारासाठी वायसीएम किंवा महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत हलविले जाते. मात्र, कोणत्याही रुग्णालयात जळीत रुग्ण कक्ष नसल्याने उपचार करण्यावर अनेक मर्यादा येतात.

‘सकाळ’चा पाठपुरावा

डिसेंबर २०२३ मध्ये तळवडे येथे मेणबत्त्या बनविण्याच्या कारखान्याला आग लागून नऊ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, शहरातील एकाही महापालिका रुग्णालयात जळीत रुग्ण उपचार कक्ष नसल्याने या दुर्घटनेतील महिलांना ससून रुग्णालयात हलविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. या घटनेनंतर प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीका झाली. ‘सकाळ’ नेही जळीत रुग्ण उपचार कक्षाची आवश्‍यकता अधोरेखित केली.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने जळीत रुग्ण उपचार कक्षासाठी जागेचे सर्वेक्षण सुरू केले. जुन्या तालेरा रुग्णालयात जळीत रुग्ण उपचार कक्ष उभारण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कक्षाचे काम सुरू आहे. त्‍याला गती देण्याची आवश्यकता आहे.

गेल्या वर्षभरातील आगीच्या गंभीर घटना

  • ऑगस्ट २०२३ : पूर्णानगर येथे दुकानासह घराला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  • ऑक्टोबर २०२३ : गॅस रिफिलिंग करताना स्फोट, स्कूल बसचे नुकसान.

  • डिसेंबर २०२३ : तळवडेत मेणबत्ती कारखान्यात स्फोट. सहा महिलांचा मृत्यू, नऊ जखमी

जळीत रुग्ण उपचार कक्षातील सुविधा

  • एकूण ३० खाटा, सहा आयसीयू

  • महिला व पुरुष वॉर्डात प्रत्येकी १२ खाटा

  • आपत्कालीन विभाग

  • अत्याधुनिक हायड्रेशन कक्ष

  • सुसज्ज ऑपरेशन थिएटर

  • प्लास्टिक सर्जरीची सुविधा

जुन्या तालेरा रुग्णालयात जळीत रुग्ण उपचार कक्षाचे काम सुरू आहे. स्थापत्य विभाग कार्यरत असून जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT