Baby with Mother
Baby with Mother Sakal
पिंपरी-चिंचवड

सिझेरियन प्रसूतीतून लूटमार सुरू; खासगी दवाखान्यांतील प्रकार

सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी - आई होणे हा जगातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. परंतु, त्यावर विरजण म्हणजे खासगी दवाखान्यातील (Private Hospital) भरमसाट शुल्क. (Fee) एकीकडे शासकीय रुग्णालयात (Government Hospital) विनामूल्य प्रसूती (Delivery) होते, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयात (Private Hospital) सिझेरियन प्रसूतीच्या माध्यमातून दिवसाढवळ्या लूटमार (Loot) सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात खासगी दवाखान्यात सिझेरियन ४० हजार ८९४ प्रसूती, तर सरकारी दवाखान्यात सिझेरियन केवळ १६ हजार ३४० झाल्याचे समोर आले आहे. खासगी दवाखान्यात बिलांच्या हव्यासापोटी महिलांची सिझेरियन प्रसूती करून रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. (Cesarean Delivery Loot Private Hospital Pimpri Chinchwad)

Hospital Delivery

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार साधारणपणे खासगी दवाखान्यात १० ते १५ टक्के सिझेरियन गृहीत असताना, ६० ते ७० टक्के सिझेरियन शहरात होत आहेत. शहरातील नामांकित दवाखान्यात एका सिझेरियन प्रसूतीमागे ८० हजार ते एक लाखापर्यंत बिल केले जाते. महापालिकेच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत विनामूल्य प्रसूती होते. त्यासाठी अवघा दीडशे ते दोनशे रुपये खर्च येत आहे. त्यातही वायसीएम रुग्णालयात सामान्य प्रसूतीचे प्रमाण सर्वाधिक असून, सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण कमी आहे. बिलांच्या फुगवट्यापोटी खासगीमधील हे चित्र वर्षानुवर्षे न बदलणारे आहे. महापालिका वैद्यकीय विभागाला सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व महापालिका स्तरावरून खासगी दवाखान्यांच्या विविध उपाययोजनांचे अधिकार दिले आहेत. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे खासगी दवाखान्यांचे फावले आहे.

अनावश्यक कारणे सांगून नातेवाईक ताणतणावाखाली असताना, सिझेरियन प्रसूतीच्या मान्यतेचा फॉर्म भरून घेतला जातो. सर्जन, वॉर्ड, ओटी, भूल स्पेशालिस्ट, ॲडमिट आणि नर्सिंग शुल्क आकारले जाते. याविषयी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी या विषयावर बोलताना उडवाउडवीची उत्तरे दिली. महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे यांनी प्रसूतीची आकडेवारी उपलब्ध करून दिली. परंतु, सिझेरियन प्रसूतीवर कोणतेही मत व्यक्त केले नाही.

सिझेरियन प्रसूती शुल्क

  • ६५ ते ६७ हजार - जनरल वॉर्ड

  • ८० ते ८२ हजार - सेमी प्रायव्हेट रूम

  • ९० ते ९५ हजार - प्रायव्हेट सिंगल रूम

वाकडमधील एका नामांकित खासगी दवाखान्यात आठ दिवसांपूर्वी प्रसूती झाली. बिल ९० हजार रुपये आले. मनीध्यानी नसताना सिझेरियन झाले. नैसर्गिक प्रसूती झाल्यास केवळ १५ ते २० हजार रुपये खर्च आला असता. तो बाळाच्या पालनपोषणासाठी वापरता आला असता. परंतु, डॉक्टरांना सध्या पैशाच्या हव्यासापोटी माता आणि पित्याचे हाल न दिसता त्यांचे खिसे भरणे जास्त योग्य वाटते. यासाठी खासगी दवाखान्यांवर कडक कारवाई होऊन वचक बसविणे गरजेचे आहे. दरपत्रक जाहीर करणे योग्य आहे.

- प्रसूत महिला

खासगी दवाखान्यात उपचार घेणारा वर्ग बदलला आहे. बऱ्याचदा उच्चभ्रू सोसायटीतील महिलांना लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे अनेक आजार असतात. सध्या तंत्रज्ञान बदलले आहे. टर्शरी दवाखान्यामध्ये शक्यतो हाय रिस्क प्रसूती होतात. स्वत:चा दवाखाना असूनही त्या केसेस टर्शरी हॉस्पिटलला आणल्या जातात. वीस वर्षात परिस्थिती बदलली आहे. बाळ दगावण्याची जोखीम कमी करण्यासाठी सिझेरियन अधिक होत आहेत. त्यामुळे या प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. कुंदन इंगळे, टेस्टट्युब बेबी तज्ज्ञ, चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT