Illegal Hoardings sakal
पिंपरी-चिंचवड

Illegal Hoarding : चाकण, कुरुळी परिसरात महामार्गावर धोकादायक लोखंडी सांगाडे

चाकण औद्योगिक वसाहत परिसराला नियमबाह्य आणि धोकादायक होर्डिंगचा विळखा पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कुरुळी - चाकण औद्योगिक वसाहत परिसराला नियमबाह्य आणि धोकादायक होर्डिंगचा विळखा पडला आहे. हे होर्डिंग काढावे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारक, स्थानिक ग्रामस्थांमधून उमटत आहेत.

चाकण एमआयडीसी, कुरुळी, चिंबळीफाटा, आळंदी फाटा, मोई, निघोजे परिसरात शेकडो महाकाय होर्डिंग झळकत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. यामध्ये अनेकांनी आपला जीव नाहक गमावला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. धोकादायक आणि नियमबाह्य होर्डिंगचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हायला हवा, त्यासाठी ‘पीएमआरडीए’ आणि संलग्न प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष याकडे द्यावे, यासंदर्भात कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

खेड तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्ग, विविध गावांच्या भागांतही मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभारले आहेत. तेही तातडीने काढावे, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.

होर्डिंगला आकाराची मर्यादा असावी, त्याचबरोबर सर्व नियमांची प्रामाणिकपणे पूर्तता करावी. होर्डिंग मालकांनी योग्य खबरदारी घ्यावी, जेणेकरून दुर्घटना टाळता येईल.

- सुनीता येळवंडे, सरपंच, निघोजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

SCROLL FOR NEXT