Lakhan Waikar Sakal
पिंपरी-चिंचवड

बकऱ्या विकल्या, कर्ज काढले अन् शिवरायांच्या पराक्रमावर सोशल मीडियावर गाणे केले प्रदर्शित

हार न मानता बावीस वर्षीय तरूणाने छत्रपती शिवरायांचा पराक्रम डोळयामसमोर ठेवून स्वरचित गाणं केलं.

सुवर्णा गवारे

हार न मानता बावीस वर्षीय तरूणाने छत्रपती शिवरायांचा पराक्रम डोळयामसमोर ठेवून स्वरचित गाणं केलं.

पिंपरी - घरात अठराविश्व दारिद्र्य. वडील दारोदारी फिरून भविष्य सांगण्याचे परंपरागत काम करतात. आई घरोघरी जाऊन गोधड्या शिवते. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दोन्ही भाऊ अपघातात गेले. तरीही, हार न मानता बावीस वर्षीय तरूणाने छत्रपती शिवरायांचा पराक्रम (Chhatrapati Shivaji Maharaj Prowess) डोळयामसमोर ठेवून स्वरचित गाणं (Song) केलं. ते प्रदर्शित (Release) व्हावं अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने कुटुंबाला आर्थिक आधार असणाऱ्या बकऱ्या विकल्या आणि कर्ज काढून शिवजयंतीनिमित्त गीत सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित केले. आता ते खूप गाजत आहे.

भोसरी चक्रपाणी वसाहत येथे‌ भटक्या विमुक्त जाती जमातीची अनेक कुटुंबे पालावर राहतात. पंचवीस वर्षांपासून याच एका पालातील व मूळच्या बारामतीच्या लखन गिरधारी वाईकर याची ही कथा आहे. आणि गीत आहे-‘जगदंबेचा भक्त खरा, राजा शिवछत्रपती’. कार्तिकी गायकवाड हिने ते गायले आहे. गावाकडे घर किंवा कोणतीही उपजीविका नाही. विविध अडचणींमुळे त्याचे दहावीपर्यंत शिक्षण. कविता करण्याचा छंद लागला. आत्तापर्यंत विविध चित्रपटांवर गाणी आणि विविध भाषांवर कविता तयार केल्या आहेत. तसेच विविध धार्मिक सामाजिक विषयांवर ५० हून अधिक कविता, १५ गाणी लिहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमावर आधारित दोन गाणी केली असून त्यातील एक गीत सोशल माध्यमांवर प्रदर्शित झाले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही त्याचे कौतुक केले आहे.

हवा मदतीचा हात...

सातवीत असल्यापासून मी गाणी लिहितो. दहावीत असताना कविता लिहिली. मात्र, त्या प्रसिद्ध करण्यासाठीची मदत मिळाली नाही. तरीही गाणी लिहिणे सुरूच ठेवले. कला माणसाला पुढे घेऊन जाते. असा विश्वास मला होता. तुमच्या लिखाणावर आम्ही पैसे का लावायचे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. गीतासाठी काढलेले कर्ज अजूनही फेडत आहे. मनमोहक या युट्युब मराठी चॅनेलवर ते प्रकाशित केले आहे, असे लखनने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT