पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीकरांची लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर दिवसभर अशी सुरू होती लगबग

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाउन करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे मोबाईल रिचार्ज, मोबाईल दुरुस्ती व अन्नधान्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊन काळात अडचणी येऊ नये म्हणून भाजी न मिळाल्यास पर्यायी कडधान्य दाळ खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. पुन्हा घराबाहेर पडणे नकोच म्हणून सध्या किराणा दुकानांबाहेर हातात सामानांच्या याद्या घेऊन नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. 

पेट्रोल पंपावर रांगा

पेट्रोल भरण्यासाठी आज सकाळपासूनच नागरिकांच्या पंपावर रांगा लागलेल्या दिसत होत्या. पुढील पाच दिवसांसाठी कडक लॉकडाउन असल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी केल्याचे चित्र सांगवी परिसरातील सर्व पंपावर पहावयास मिळत होते.

चायनिज सेंटर चौपाट्यांवर शुकशुकाट

लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यावर काही प्रमाणात चायनिज चौपाट्यांवर पार्सलद्वारे ही सेंटर सायंकाळी पाचपर्यंत सुरू होती. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने येथील सांगवी परिसरातील अशा चौपाट्यावरील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना संकटाआधी सकाळपासूनच गजबज असलेल्या या चौपाट्यांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

SCROLL FOR NEXT