Narayan Rane
Narayan Rane sakal
पिंपरी-चिंचवड

काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा

काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काम करत नसल्याने त्यांच्या आमदारावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही.

पिंपरी - काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काम करत नसल्याने त्यांच्या आमदारावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही. म्हणूनच काँग्रेसच्या उमेदवाराचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. कॉग्रेस संकुचित पावत चालली आहे. कॉग्रेसचे अस्तित्व राहिले नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी फुगेवाडी येथे केली.

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत राणे यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसचे काय राहिले आहे, ना देशात ना महाराष्ट्रात. काँग्रेस संकुचित पावत आहे. त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. देशात कोणत्याही प्रकारचं काम त्यांचे कार्यकर्ते व नेते करीत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला.

एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात? अस सांगायच नसते - राणे

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते भाजपच्या संपर्कात आहेत का, असे विचारले असता राणे म्हणाले, 'असं सांगायचं नसतं, मग नॉट रिचेबल राहून काय उपयोग'. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार का, असे विचारले असता राणे म्हणाले, "एक दिवस तरी मुख्यमंत्र्यांना स्वस्थ काढू द्या ना'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT