पिंपरी-चिंचवड

पुणे : मीटरचे रीडिंग न पाठवणाऱ्या वीजग्राहकांना असा बसेल 'झटका'

आशा साळवी

पिंपरी : लॉकडाउनमुळे महावितरणने गेल्या दोन महिन्यांपासून वीजग्राहकांना स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र, पुरेशा जागृतीअभावी लाखो ग्राहकांनी अद्याप रीडिंग पाठविलेच नाही. पुणे परिमंडलातील केवळ दोन टक्केच ग्राहकांनीच रीडिंग पाठविले. परिणामी उर्वरित ग्राहकांना जादा वीजबिलाचा 'शॉक' बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष जाऊन मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. बिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणेदेखील बंद केले आहे. वीजग्राहकांनी स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविले आहे. त्यांना प्रत्यक्षात केलेल्या वीजवापरानुसार अचूक वीजबिल दिले आहे. मेमध्ये पहिल्यांदाच चालू रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना एप्रिलच्या बिलातील सरासरी युनिट व रक्कम भरली असल्यास त्याचेही समायोजन करण्यात येत आहे.

  • पुणे परिमंडलमधील ग्राहक : 29 लाख 26 हजार 
  • रीडिंग पाठविणारे : 69 हजार 912 
  • टक्के : 2.38

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिमंडलातील भाग : पुणे, पिंपरी चिंचवड शहर, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे

यावर पाठवा मीटर रीडिंगचा फोटो : www.mahadiscom.in

महावितरण ऍप

नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून 'एसएमएस' पाठविला जातो. त्यात मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद केली जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अशी आहे सूट

सर्व ग्राहकांना एप्रिलच्या प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले दिली आहेत. मात्र, ज्या ग्राहकांनी एप्रिलमध्ये रीडिंग न पाठवता मेमध्ये चालू मीटर रीडिंग पाठविले त्यांना एप्रिल व मेचे प्रत्यक्ष वापरानुसार बिल देण्यात येत आहे. या बिलामध्ये एप्रिलचे सरासरी युनिट वगळण्यात येत आहे. ग्राहकांनी एप्रिलचे सरासरी बिल भरले असल्यास त्यातील "फिक्‍स्ड चार्जेस'ची रक्कम वगळता उर्वरित रक्कमसुद्धा मेच्या बिलात समायोजित करण्यात येत आहे. तसेच स्लॅब बेनिफिटदेखील देण्यात येत आहे. मात्र, रीडिंग उपलब्ध नसल्यास सरासरी बिल पाठविण्यात येईल असे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी सांगितले.

येथे करा मोबाईल नोंदणी : मोबाईल : 9930399303

असा पाठवा मॅसेज : MREG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) 

कॉल सेंटर : 1912, टोल फ्री : 18001023435,18002333435

मोबाईल क्रमांक नोंदलेले ग्राहक

  • भोसरी, पिंपरी विभाग : 6 लाख 15 हजार
  • मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड : 6 लाख 83 हजार 968

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Tiger Death: जंगलातून शेतापर्यंत वाघांचा पाठलाग; झुंजीत नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

Ramdas Athawale: बारा वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटाला संधीची प्रतीक्षा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

Latest Marathi News Live Update : एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार? अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

SCROLL FOR NEXT