पिंपरी-चिंचवड

संततधार पावसाने मावळातील बळिराजा सुखावला; भात पिकाला होणार फायदा

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुनरागमन झालेल्या पावसाची गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकासाठी अतिशय उपयुक्त असून, गरजेच्या वेळी तो पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळात सुमारे दीड महिना पावसाने दडी मारली होती. नाणे मावळचा भाग वगळता त्याची अवकृपा झाली होती. अती पावसाचा समजला जाणारा जुलै महिना कोरडा गेला होता. गेल्या सोमवारपासून त्याचे पुनरागमन झाले. गेल्या आठ-दहा दिवसांत कमी अधिक प्रमाणात तो बरसला. गेल्या दोन दिवसांपासून मात्र त्याची संततधार सुरू आहे. गेल्या दहा दिवसांत वडगावात 208 मिलीमीटर, तळेगावात 184, कामशेतमध्ये 227, पवनानगरमध्ये 414, कार्ला येथे 630 तर लोणावळा येथे एक हजार चार मिलिमीटर पाऊस झाला. पावसाअभावी तालुक्‍याच्या आंदर व पूर्व भागातील सुमारे 25 ते 30 भात लावणी रखडली होती. खाचरातील पाणी आटल्याने लागवड झालेले भात पीकही धोक्‍यात आले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने भातासह सर्वच खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

पाऊस सुरू झाल्यानंतर रखडलेल्या भात लागवडीलाही चालना मिळाली आहे. भाताच्या एकूण बारा हजार शंभर हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे बारा हजार हेक्‍टर क्षेत्रावरील लागवड पूर्ण झाली आहे. त्यात साडेदहा हजार हेक्‍टर पारंपरिक लागवडीचा तर दीड हजार हेक्‍टरवरील चारसूत्री लागवडीचा समावेश आहे. तालुक्‍यातील सुमारे 98 टक्के भात लावणी पूर्ण झाली असून, येत्या दोन-चार दिवसांत शंभर टक्के लागवड पूर्ण होईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी व्यक्त केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पवना धरणात 57 टक्के पाणीसाठा 

गेल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्या गतीने वाढ होत आहे. जून, जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने धरणाची पाणीपातळी कमी झाली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुले पवना 57, आंद्रा 89, वडिवळे 73, कासारसाई 97 टक्के भरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT