पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी १८० नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६९ हजार ३३५ झाली आहे. आज १६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६३ हजार ७६१ झाली आहे. सध्या एक हजार ४३९ सक्रिय रुग्ण आहेत.
आजपर्यंत शहरातील चार हजार ३९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ६३२ रुग्ण उपचार घेत आहेत. ८०८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १४ लाख २९ हजार ८९७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ३८ मेजर व ३९५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४९३ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ७२८ जणांचे विलगीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.