Court Media Gallery
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : नितीन लांडगे यांना अंतरिम जामीन मंजूर

इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

या प्रकरणातील इतर आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. त्यांनी देखील जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर बुधवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे. आरोपींची पोलिस कोठडीत संपत असल्याने त्यांना आज (ता. २३) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. गोरक्षनाथ काळे यांनी लांडगे यांच्यावतीने जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात तपास पूर्ण झालेला आहे.

अर्जदार लांडगे यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. कौटुंबिक कारणासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. परदेशी आणि ॲड. काळे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. इतर आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग, ॲड. कीर्ती गुजर, ॲड. संजय दळवी यांनी कामकाज पाहिले.

लाचेच्या या प्रकरणात लांडगे यांच्यासह त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक आॅपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

गुरुवारी पुन्हा हजर होण्याचे आदेश :

लांडगे यांना २६ आॅगस्टपर्यंत अंतरिम जामीन मंजूर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजेपर्यंत न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT