varsha-gaikwad
varsha-gaikwad 
पिंपरी-चिंचवड

बदल्यांसाठी ऑनलाइन पोर्टल करणार;वर्षा गायकवाड यांचे आश्‍वासन 

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - ""अशैक्षणिक कामाचा भार कमी करण्याबरोबर नगरपालिका, महापालिका शाळांतील बदल्यांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणे, समान वेतन, सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न करू,'' असे आश्‍वासन क्रीडा व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी येथे दिले. 

नगरपालिका व महापालिका शिक्षक संघाच्या वतीने वरसोलीतील सुमंत पॅलेस येथे आयोजित शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. आमदार संजय जगताप, शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, औदुंबर उकिर्डे, मीनाक्षी शेंडकर, संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी, राज्य उपाध्यक्ष आनंदराव कोळी, सरचिटणीस अरुण पवार, साधना साळुंखे उपस्थित. 

गायकवाड म्हणाल्या, ""शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी प्रथमच स्वाध्याय योजना उपलब्ध करून दिली आहे. दिशा ऍप, गुगल प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, शिक्षकांनी शिकविण्यावर फोकस करीत उद्याचे भविष्य घडविण्याचे काम करावे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क आहे.'' 

जगताप म्हणाले, ""शिक्षण मंडळे काही अंशी फायदेशीर होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण मंडळाचे पुनरुज्जीवन करावे.'' दत्तात्रेय जगताप म्हणाले, ""विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे ही पूजा असून, शिक्षकांनी आपल्या कामातून प्रेरणा निर्माण करावी.'' 

नगरपालिका व महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणारे आदर्श शिक्षकांना आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, उत्कृष्ट शाळा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT