Crime
Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

सुनेसह नऊ महिलांचा सासूच्या घरासमोर राडा; भाडेकरूंना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

सुनेसह तिच्यासोबत असलेल्या महिलांनी सासूच्या घरासमोर येऊन राडा घातला. भाडेकरूंना मारहाण केली. हा प्रकार जुनी सांगवी येथेव घडला.

पिंपरी - सुनेसह तिच्यासोबत असलेल्या महिलांनी (Women) सासूच्या घरासमोर येऊन राडा घातला. भाडेकरूंना मारहाण (Beating) केली. हा प्रकार जुनी सांगवी येथेव घडला.

याप्रकरणी संगीता अंकुश कवडे (रा. लक्ष्मीनगर, एकता चौक, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभांगी अविनाश कवडे (रा. चिंचवड) व अनोळखी दहा महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. १७) दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी या घरी असताना ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी खाली बघितले असता फिर्यादी यांची सून व इतर नऊ महिला ओरडून शिवीगाळ करीत होत्या.

त्यावेळी आरोपी व तिच्यासोबत असलेल्या सहा महिलांनी फिर्यादीच्या इमारतीतील शॉपमधील भाडेकरू व कामगार दिनेश जगाराम कुमार, शाहबाजअली हसीमअली शेख, मुलाभाई वज्जाभाई प्रजापती यांना हाताने मारहाण केली. इतर चार महिला बाजूला थांबून शिवीगाळ करीत होत्या. दरम्यान, फिर्यादी यांची सून व तिच्यासोबत सहा महिला भाडेकरूंना हाताने मारहाण करीत असताना दिनेश जगाराम कुमार यांच्या नाकाला दुखापत झाली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT