crime news wakad One killed anger over spilling glass of liquor pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Crime News : दारूचा ग्लास सांडल्याच्या रागातून एकाचा खून

खून करून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह फेकणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

वाकड : दोघेजण एकत्र दारू पीत बसलेल्या दोघांपैकी एकाकडून दारूचा ग्लास सांडल्याच्या रागातून काठीने, दारूच्या बाटलीने तोंडावर, डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागावर मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून केल्यांनतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून तो कचरा म्हाळुंगे गावाजवळ रस्त्याच्या कडेला टाकुुुन पुरावा नष्ट केल्याचेही स्पष्ट झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी निलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात या दोघांना अटक केली असून दोघे फरार आहेत.

मयताची पूर्ण ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे नाव बालाजी असून तो नांदेड येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो परिसरात फिरस्ती होता. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबत पत्रकार परिषेदेत माहिती दिली १५ जुलै रोजी सायंकाळी माण-म्हाळुंगे रस्त्याच्या कडेला कच-याच्या ढिगाऱ्यात अनोळखी यामृतदेह आढळला होता. हिंजवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करूनवरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी तपासासाठी दोन पथके तैनात केली. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की,आरोपी निलेश आणि मयत हे नेहमी दारू पीत बसतात त्यावरून निलेशला शिताफीने ताब्यात घेऊन तपास केला असता बालाजीकडून दारूचा ग्लास सांडलयाच्या रागातूनच मारहाण करून खून केल्याचे त्याने सांगितले.

या खुनाबाबत घटनास्थळी काही हालचाली होतात का यावर देखील त्याने तिथे जाऊन दारू घेण्याच्या बहाण्याने दोन दिवस टेहळणी केल्याचे पोलिसांना सांगीतले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून कचरा टाकणा-या गाडीची ओळख पटवून पोलिसांनी चालक राजेंद्र यालाही अटक केली. कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कच-यासोबत बालाजीचा मृतदेह देखील गाडीत भरला असल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करून पुरावा नष्ट केल्याने अतिरिक्त गुन्ह्यांची वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहायक निरीक्षक राम गोमारे व सागर काटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT