crime update police arrest thief climbed through duct of building and stole idols of god pimpri
crime update police arrest thief climbed through duct of building and stole idols of god pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

इमारतीच्या डक्टमधून चढून देवांच्या मूर्ती चोरणारा अखेर गजाआड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सोसायटीत सफाईचे काम करणारा चोरटा इमारतीच्या डक्टमधून चढून तिसऱ्या मजल्यावर आला. बाल्कनीतून घरात शिरून सोने-चांदीच्या दागिन्यांसह चांदीच्या देवांच्या मूर्ती असा एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. संशय न येण्यासाठी हा भामटा घरमालकाचाच शर्ट घालून पडला बाहेर पडला. अखेर हिंजवडी पोलिसांनी या चोरट्याला अटक केली. ही घटना बालेवाडी स्टेडियमजवळील म्हाळुंगे येथे घडली.

अक्षय अंबादास गवारे (वय २०, रा. सुसगाव, मूळ- पाथरगव्हाण, ता. पाथरी, जि . परभणी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रसेन अरविंद पाटील (रा. एफ ३०१ सारथी स्कायबे बालेवाडी स्टेडियममागे, म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीत सफाईचे काम करतो. फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर आरोपी घराची पाहणी करून गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी पुन्हा पार्किंगमध्ये जाऊन इमारतीच्या डक्टमधून तिसऱ्या मजल्यावर आला. बाल्कनीतून फिर्यादीच्या घरात शिरला.

घरातील सोने-चांदीचे दागिने, चांदीच्या देवांच्या दोन मूर्ती असा एकूण एक लाख ७६ हजारांचा ऐवज चोरला. त्यानंतर संशय न येण्यासाठी हा भामटा फिर्यादी यांचा शर्ट परिधान करून घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडला.मात्र, सखोल तपास करून अखेर पोलिस आरोपीपर्यंत पोहोचलेच. सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT