पिरंगुट : लवासा (lavasa) परिसरातील दासवे (ता. मुळशी) येथे अतिवृष्टीमुळे घरे आणि शेती वाहून गेल्याने मरगळे कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. दासवे (dasave) येथील पडळघर भागात नुकत्याच झालेल्या ढगफुटीत चोवीस तासांत तब्बल ४२५ मि.मी. इतका विक्रमी पाऊस झाला. त्यावेळी येथील पडळघर भागातील रस्त्यालगत दरड कोसळल्यामुळे मुलाजी मरगळे व बाळू मरगळे यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले. (dasave area margale family home haivy rain carried)
बाळू मरगळे यांची तीन घरे व एक एकर भात शेती वाहून गेली. तर, मुलाजी मरगळे यांचे स्लॅबचे घर आणि तीन एकर शेती वाहून गेली. घरातील जीवनावश्यक सर्व वस्तू व एक मोटारसायकलही वाहून गेली आहे. शेतातील सर्व जुनी झाडेही वाहून गेली. तसेच, घरासमोरील लवासा-पानशेत रस्ताही वाहून गेला. येथील नुकसानीची पाहणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे व सरपंच शशिकांत मोरे यांनी केली.
या वेळी मरगळे कुटुंबाला कोंढरे यांनी तातडीने रोख अकरा हजार व मोरे यांनी सात हजार रुपयांची मदत केली. याशिवाय ग्रामपंचायतीच्यावतीने १५ टक्के निधीमधून आवश्यक कपडे व एक महिन्याचा किराणा देण्यात आला. तसेच, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन खेरै, सचिन दगडे व अमित कुडले यांच्यावतीने रोख रक्कम, भांडी, ब्लॅंकेट व धान्याची मदत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले यांनी लवासा कंपनीचे सुरेश पेंढारकर यांची भेट घेऊन मरगळे कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.