पिंपरी-चिंचवड

हे हिरवंगार शेत नाहीये...ही तर पवना नदीपात्रातील...

सकाळ डिजिटल टीम

जुनी सांगवी : येथील मुळा व पवना नद्यांमध्ये वाहून आलेली जलपर्णीमुळे नदीपात्र आच्छादली आहेत. तसेच, रस्त्यांची रखडलेली कामे व नालेसफाई कामाला गती द्यावी, या बाबत शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवेदनात म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात आयुक्तांचा पाहणी दौरा झाला. मात्र, आठवडा झाला तरी कामाला गती नाही. कोरोनाचे संकट, तर आहेच. मात्र, सांगवीकरांना डास व दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. सध्या जलपर्णी काढण्याचे काम संथगतीने सुरू आहे. नेहमीप्रमाणे संबंधित ठेकेदार मोठ्या पावसाची वाट पहात आहे का, असे सुरू असलेल्या कामावरून दिसत आहे. 

डास व दुर्गंधीमुळे नदीकिनारा भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. याबरोबरच सध्या कुठल्याही रस्त्याचे नविन खोदकाम न करता सद्य:स्थितीत पाण्याचा निचरा होईल, अशा दुरुस्त्या कराव्यात. स्टॉर्म वॉटर, उघडे नाले, पाणी साचण्याची ठिकाणे अशा ठिकाणांची स्वच्छता करावी. गतवर्षीची सांगवीकरांनी अनुभवलेली पुरस्थिती पाहता त्याचे नियोजन आतापासूनच करावे. आपला दौरा केवळ देखावा ठरू नये, असेही शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT