divyang student giving 12 exam paper Pimple Gurav sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरव मधील दिव्यांग मुलीने दिला बारावीचा पेपर

दोन वर्षानंतर प्रथमच बारावीची ऑफलाईन परीक्षा पेपरसाठी वाढीव वेळ

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा

पिंपळे गुरव : करोना महामारीमुळे मागील वर्षी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या.करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देत आहेत.या दृष्टीने या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे.पिंपळे गुरव सुदर्शन नगर येथील धडपळे सेंटर मधील आरती सोफोश या १८ वर्षीय दिव्यांग विद्यार्थीनीने इंग्रजी विषयाचा पेपर दिला. या विद्यार्थीनीसाठी शाळेचे प्राचार्य आनंद माहुरकर यांनी या विद्यार्थीनीची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली होती.

या परीक्षेसाठी बाबुरावजी घोलप विद्यालय व ज्युनियर कॉलेज सांगवी येथील बारावीच्या परीक्षेसाठी ५५६ विद्यार्थी पेपर देत असून येथे एकूण २३ वर्ग आहेत.पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असल्याने सकाळी साडेनऊ वाजताच विद्यार्थी,पालक उपस्थित होते. उपप्राचार्य व केंद्र प्रमुख विलास निमसे यांनी परीक्षा विद्यार्थ्यांना सर्व सूचना दिल्या.या प्रसंगी प्राचार्य आनंदराव माहुरकर यांनी कॉपीमुक्त परीक्षेचे आव्हान करून परीक्षेचे मार्गदर्शन केले.

ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पेपरसाठी तीस मिनिट व दिव्यांग विद्यार्थ्यांना एक तास जास्त असल्याचे केंद्र प्रमुख विलास निमसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT