Dog
Dog Sakal
पिंपरी-चिंचवड

मला कोणी माझ्या माणसांमध्ये पोचवेल का?

सकाळ वृत्तसेवा

मोशी - मला कोणी माझ्या माणसांमध्ये पोचवेल का... अशी आर्त हाक मोशी प्राधिकरण पेठ क्रमांक 4 मधील दसरा चौकात प्रत्येक पाहणाऱ्या नागरिकांना एक कुत्रा (श्वान) हाक तर माहित नाही ना... असा प्रश्‍न प्रत्येकाला पडला आहे.

ही परिस्थिती आहे मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4 मधील दसरा चौकामधील. गेल्या चार-पाच दिवसांपासून या चौकांमध्ये एक गोंडस असलेला मात्र वयस्कर होऊन वृद्धत्व आल्यामुळे याच चौकामध्ये घुटमळत असणारे हे श्वान सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माहिती काढली असता जवळूनच जाणाऱ्या एका नागरिकाने सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी रात्री उशिरा एका कारमधून हा कुत्रा या चौकांमध्ये सोडला गेला आणि तेव्हापासून हा या थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत प्रत्येक नागरिकाजवळ घुटमळत आहे. ज्यांनी या ठिकाणी या श्वानाला सोडले आहे त्यांची हा श्वान मला पुन्हा कोणीतरी आज ना उद्या न्यायला येईल अशा भोळ्या भाबड्या आशेने वाट पाहत आहे. आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाकडेही याच एका आशेने पाहत आहे. तसेच मागे मागे ये जा करत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या प्राधिकरण परिसरामध्ये अशी वृद्धत्व आलेले श्वान सोडून देण्याचे प्रकार घडत आहेत. प्राणी मित्र विठ्ठल वाळुंज यांनी सांगितले की, नागरिक मोठ्या हौसेने मोठ्या रकमा देऊन अशी गोंडस पिल्ले घरी पाळण्यासाठी घेऊन येतात. या पिल्लांना एखाद्या मुलाचा सांभाळ करणार नाहीत त्याहीपेक्षा महागडे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तू त्यासाठी विकत घेऊन त्याचा लाडाने सांभाळ करतात. अगदी घरातील एका सदस्याप्रमाणे त्यांची सर्व व्यवस्था ठेवली जाते. मात्र अनेक वर्ष प्रामाणिकपणे निष्ठेने आपल्या घराची राखण केली त्याच राखणदाराला वृद्धत्व आल्यावर या अशा प्रकारे नागरी वस्तीमध्ये सोडून देण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी लाडाने असे श्वान पाळीव प्राणी घरी पाळले आहेत त्यांनी त्यांना शेवटपर्यंत सांभाळणे आवश्यक आहे. नाहीतर अशी पाळीव प्राणी न पाळलेलेच बरे. कारण माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांच्या भावना दुखावणे हे नक्कीच माणूस जातीला शोभत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT