पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ई-पॉस मशीनमध्ये बिघाड कायम, धान्य वाटपात अडचणी! 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वाटप होत असताना ई-पॉस मशीनमधील तांत्रिक बिघाडाची समस्या कायम आहे. त्यामुळे धान्य वाटपात अडचणी निर्माण होऊन शिधापत्रिकाधारकांना नाहक ताटकळत थांबावे लागत आहे. काही वेळेस दुकानदारांना ऑफलाईन धान्य वाटप करणे भाग पडत आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण दिले जावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बेमुदत बंद पुकारला आहे. मात्र, या काळात देखील शिधापत्रिकाधारकांची अडचण होऊ नये म्हणून सहकार्याची भावना ठेवत काही ठिकाणी धान्य वाटपही केले जात आहे. मात्र, तेथेही ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याने धान्य वाटपात अडचणी येत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, "सध्या स्वस्त धान्य दुकानदारांनी बेमुदत बंद पुकारला आहे. परंतु, काही ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जात आहे. ई-पॉस मशीनवर अंत्योदय, अन्नसुरक्षा योजनेबरोबरच मोफत तांदूळ आणि डाळ वाटपाचीही नोंद केली जात आहे. त्यामुळे, मशीनवर ताण पडून दिवसभरात 2 ते 3 वेळा बंद पडण्याची समस्या कायम आहे. मशीन पूर्ववत सुरु होण्याची वाट पहावी लागते. अनेकदा दुकानदारांना त्यांचे व्यक्तिगत वाय-फाय वापरावे लागते किंवा लिहून घेऊन धान्य दिले जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, "पिंपरी-चिंचवड शहरात धान्य वाटप सुरळीतपणे चालू आहे. ई-पॉस मशीन बंद पडत नाही. रोजच्या धान्य वाटपाच्या नोंदी होत असल्याने सर्व्हरवर ताण येत आहे. काही ठिकाणी बॅटरीची तर काही भागांत इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीची समस्या आहे. वादळवाऱ्याने मोबाईल टॉवरलाही नुकसान झाले आहे. त्याबाबत, आम्ही राज्य शासनाला कळविले असून एनआयसी तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम करत आहे.'' 

विमा संरक्षणाबाबत निर्णय नाही ! 

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, त्यांच्या कमीशनमध्ये वाढ केली जावी. या मागण्यांबाबत राज्य शासन स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, अनेक दुकानदारांनी बंदला पाठिंबा दर्शवित धान्य वाटप चालू ठेवले आहे. या मागण्यांवर लवकर निर्णय घेतले जावेत, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT