पिंपरी-चिंचवड

मावळात आठ नवे पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या दोनशेच्या जवळ            

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात शनिवारी (ता. ११) तळेगाव येथील तीन, इंदोरी व ब्राम्हणवाडी (साते) येथील प्रत्येकी दोन व वडगाव येथील एक, अशा एकूण आठ जणांचे  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९२ झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडगाव येथील एका हाउसिंग सोसायटीमधील ३१ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पिंपळे सौदागर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तो गृहविलगीकरणात असून, तो राहत असलेली इमारत कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आली आहे; तर माळीनगर भाग बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या संपर्कातील एकाचा स्वॅब घेण्यात येणार आहे. 

तळेगाव येथील २१ वर्षीय दोन मित्रांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते आकुर्डी येथील कंपनीत कामाला आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांच्यावर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील दोन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तळेगाव येथील रहिवासी व टाकवे बुद्रुक येथील कंपनीतील ३० वर्षीय कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याची चाचणी घेण्यात आली होती. सध्या तो गृहविलगीकरणात आहे.

इंदोरी येथील एका खासगी नोकरी करणाऱ्या ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आकुर्डी येथे उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. येथील दुसऱ्या एका ३० वर्षीय कामगाराचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील सात जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. ब्राम्हणवाडी (साते) येथील ३५ वर्षीय पुरुष व त्याची २६ वर्षीय पत्नी या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपर्कातील १६ जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

दरम्यान, शनिवारी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९२ झाली आहे. त्यात शहरी भागातील ७७, तर ग्रामीण भागातील ११५ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथील सर्वाधिक ५८, लोणावळा येथील १५ तर वडगाव येथील रुग्ण संख्या चार झाली आहे. आतापर्यंत  नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १०० जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT