पिंपरी-चिंचवड

पिंपरी : सोसायट्यांच्या निवडणुका 'या' महिन्यापर्यंत लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सहकारी गृहरचना सोसायट्यांच्या निवडणुकांना सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या असून, त्यात शहरातील सहाशे सोसायट्यांचा समावेश आहे. नव्याने निवडणुका घेण्यासाठीची नियमावली राज्य सरकारने अद्याप जाहीर न केल्याने सोसायटीचे काम पाहणाऱ्या कार्यकारिणीला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचे पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचे सदस्य चारुहास कुलकर्णी यांनी सांगितले.

सरकारने 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहरचना सोसायट्यांना त्यांच्या पातळीवर निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी त्यासंदर्भातील नवी नियमावली सरकारने अद्याप तयार केलेली नाही. या अगोदर डिसेंबर 2019, त्यानंतर फेब्रुवारी आणि आता सप्टेंबरपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, सरकारकडून नियमावली जाहीर होत नाही, तोपर्यंत आता काम पाहणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाज पाहायचे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही ठिकाणी निवडणुका होऊन पाच वर्षांचा अवधी पूर्ण झाला आहे, अशा सोसायट्यांचे काम देखील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुन्याच कार्यकारिणीने पाहायचे असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी होत नसल्याने निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. सरकारकडून सप्टेंबरपर्यंत नियमावली तयार करण्याचे काम पूर्ण झाले, तरी कोरोनाचे संकट वाढत असल्याने ते जोपर्यंत पूर्णपणे हटणार नाही. तोपर्यंत सोसायट्यांकडून लगेच निवडणुका घेण्याची शक्‍यता नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT