Ramdas Athawale Sakal
पिंपरी-चिंचवड

गाव तेथे महिला आघाडीची शाखा स्थापन करा - रामदास आठवले

देशात स्त्रियांवर अत्याचार वाढले आहेत. पालकांनी आपल्या तरूण मुलांवर लक्ष द्या. अन्यथा हयगय केली जाणार नाही. गाव तेथे आरपीआय महिला आघाडीची शाखा स्थापन करा.

सकाळ वृत्तसेवा

देशात स्त्रियांवर अत्याचार वाढले आहेत. पालकांनी आपल्या तरूण मुलांवर लक्ष द्या. अन्यथा हयगय केली जाणार नाही. गाव तेथे आरपीआय महिला आघाडीची शाखा स्थापन करा.

पिंपरी - देशात स्त्रियांवर अत्याचार वाढले आहेत. पालकांनी आपल्या तरूण मुलांवर लक्ष द्या. अन्यथा हयगय केली जाणार नाही. गाव तेथे आरपीआय महिला आघाडीची शाखा स्थापन करा. शाखेच्या माध्यमातून महिलांवर होणारा अत्याचार थांबवा, असे आवाहन रिपप्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे सोमवार (ता. ३१) केले.

आरपीआय प्रदेश महिला आघाडीच्या राज्यस्तरिय बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहिर करून, त्यांच्या हस्ते पदांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सिमा आठवले, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता आठवले, केंद्रिय समिती सरचिटणीस अ‍ॅड. आशा लांडगे, केंद्रिय समितीच्या सचिव शिला गांगुर्डे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभया सोनवणे आदींसह महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यांमधून महिलां पदाधिकारी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मातील महिलांसाठी हिंदु कोड बिल कायदा बनवला होता. मात्र तो पास केला नाही, म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीणामा दिला होता. आजची स्त्री शिक्षण घेत आहे. आरपीआय महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत करणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांची आरपीआय महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केल्याचे आठवले यांनी जाहिर करून त्यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT