firing on Sankalp Farm manager in Vahangaon
firing on Sankalp Farm manager in Vahangaon 
पिंपरी-चिंचवड

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली अन् त्यांनी झाडल्या गोळ्या

सकाळवृत्तसेवा

कामशेत(पिंपरी) : वाहनगाव येथील संकल्प फार्ममध्ये जाणाऱ्या मॅनेजरवर दोघांनी गोळीबार केला. या हल्ल्यात मॅनेजरच्या पोटाला तीन गोळ्या लागल्या असून मानेजवळून ही गोळी चाटून गेली. त्याच्यावर सोमाटणेतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आहे.


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मिलींद मधुकर मनेरीकर रा.तळेगाव स्टेशन असे या मॅनेजरचे नाव आहे, प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार मनेरीकर नेहमी प्रमाणे सकाळी साडेनऊच्या सुमारास महिंद्रा एक्सयुव्ही गाडीतून नागाथली जवळच्या कच्च्या रस्त्याने जात होते. वडेश्वर वाहनगाव मुख्य रस्त्या पासून दीड किलोमीटर अंतरावर मनेरीकर पोहोचताच, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हात दाखवून त्यांची गाडी थांबली आणि त्यांच्यावर जवळून गोळीबार केला, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनेरीकर त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे सहकारी चेतन निमकर यांनी ही माहिती फार्म मधील कर्मचाऱ्यांना दिली, कामगारांनी त्यांना तातडीने उपचारार्थ सोमाटणेतील खाजगी दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नाकाबंदी केली आहे. मनेरीकर मागील तीस वर्षापासून येथे नोकरी करीत आहेत, फुलशेती उत्पादनात त्यांचा हातखंडा असून केशर आणि हापूस आंब्याची लागवड त्यांनी केली आहे. पंचक्रोशीतील अनेकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून स्थानिक गावकऱ्यांनी दवाखान्यात गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT