पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मावस बहिणींचं अपहरण करून केला अत्याचार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : अल्पवयीन मावस बहिणींचं अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. 

करण भैरवनाथ साबळे (वय 21), आशिष आनंद सरोदे (वय 20), निवास संजय सुतार (वय 20), तेजस राजू वाघमारे (वय 19), कार्तिक ऊर्फ टिंक्‍या राजकुमार चव्हाण (वय 21, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. 15) रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी आशिष सरोदे याने फिर्यादी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, करण साबळे याने फिर्यादीच्या मावस बहिणीशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर साबळे व सरोदे यांनी इतर आरोपींना बोलावून त्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने एका मोटारीत बसवून चिंचवड स्टेशन येथे घेऊन गेले. तेथे आरोपींनी पहाटे पाच वाजेपर्यंत मुलींना आपल्या ताब्यात ठेवले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, तेथून पीडित मुली स्वत:ची सुटका करून घेत घरी आल्या. नातेवाइकांना सर्व हकिगत सांगितल्यानंतर नातेवाइकांनी निगडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पाचही आरोपींना चार तासातच जेरबंद केले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, आशिष याला सात दिवसांची, तर करण याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT