पिंपरी-चिंचवड

Video : देवेंद्र फडणवीस म्हणतायत, कोरोनावर लॉकडाउन हा पर्याय नाही

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : कोरोना संसर्गाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यावर पुन्हा लॉकडाउन हा पर्याय नाही. लोकांची मानसिकताही तशी राहिलेली नाही. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येकाला अधिक सावध राहावे लागेल, असे सुतोवाच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात अधिकारी, पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेतली. रुग्णांचे वाढते प्रमाण व उपाययोजनांची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. बाह्यरुग्ण विभागाची पाहणी करून माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "रुग्ण संख्या वाढत आहे. त्यात काही गंभीरही आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजन सुविधा असलेले बेड वाढवावे लागणार आहेत. महापालिकेने केलेला डॅशबोर्ड चांगला आहे. त्याद्वारे उपाययोजनांबाबत व्यवस्थापन करणे सोपे जाईल. तसेच, यापुढे आपल्याला अधिक अलर्ट राहावे लागणार आहे. अधिक बेड व मनुष्यबळ उभे केले जात आहे. आता पुन्हा लॉकडाउन करता येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. लोकांची मानसिकताही तशी राहिलेली नाही. त्यामुळे सावध राहणंच महत्त्वाचे ठरणार आहे.'' 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण अकरा मार्चला आढळला होता. त्यानंतर संख्या वाढत गेली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाउन झाले. परंतु, २१ मेनंतर हळूहळू नियम शिथिल केले. लोक घराबाहेर पडू लागले आणि रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. शहरासाठी ही धोक्‍याची सूचना आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विधानसभचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी वायसीएममध्ये आले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांची शहरासाठीची भेट महत्त्वाची मानली जात आहे. महापालिकेने वायसीएम रुग्णालय कोवीड-19 साठी जाहीर केले आहे. साधारणतः एक तास फडणवीस वायसीएममध्ये थांबले. दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते मोटारीने पुण्यातील नायडू व ससून रुग्णालयाकडे रवाना झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस वायसीएमध्ये आले त्या वेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळलेच नाही. त्यांच्या स्वागतासाठी व बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी बैठकीस उपस्थित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

SCROLL FOR NEXT