Pimpri Chinchwad Municipal Corporation and Girish Bapat
Pimpri Chinchwad Municipal Corporation and Girish Bapat sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात बापट यांचे मोलाचे योगदान

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलटवून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा मोलाचा वाटा होता.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलटवून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा मोलाचा वाटा होता. बापट यांच्याकडे त्यावेळी निवडणूक प्रभारी या पदाची जबाबदारी पक्षाने टाकली होती व त्यांनी ती चोखपणे बजावली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही राष्ट्रवादी कॉंग्रेस व विशेषत: विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यात सर्वश्रूत आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदि यांची लाट असली तरी स्थानिक नेतृत्वामध्ये समन्वयकाची जबाबदारी पार पाडण्यासाठी अनुभवी व कुशल नेतृत्वाची अत्यंत गरज होती. ती गरज ओळखून पक्षाने तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवडणुकीचे प्रभारी पद सोपविले होते.

२०१७ च्या निवडणुकीच्या वेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष होते. तर; या निवडणुकीच्या तोंडावरच तत्कालीन अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा भाजपात पक्ष प्रवेश घडवून आणण्यात आला होता. त्याच वेळी माजी महापौर आझम पानसरे यांनाही भजपात आणून तत्कालीन मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला होता. त्यावेळी पक्षात आलेले हे दिग्गज व पक्षातील निष्ठावंत यांची मोट बांधणे अत्यावश्‍यक होते.

महापालिका निवडणुकीत प्रत्येक स्थानिक नेत्यांचे उमेदवार बसवितानाच पक्षाचे निष्ठावंतही नाराज होता कामा नये, अशी तारेवरची कसरत व जिकरीचे काम बापट यांनी लिलया पार पाडले होते. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना आज बापट गेल्यानंतर या घटनांची प्रखरतेने आठवण झाली नसेल तर नवलच.

सर्वांना बरोबर नेण्याचे नेतृत्व कौशल्य कामी आले...

गिरीश बापट यांची सर्व पक्षात असलेले मित्रत्वाचे संबंध व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी या त्यांच्या नेतृत्व कौशल्यांचा उपयोग २०१७ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अनुभवयाला मिळाला होता. पक्षात आलेल्या अन्य पक्षांच्या नवख्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी योग्य तो सन्मान देत उमेदवारी दिली होती. त्यामुळेच महापालिकेत भाजपचा झेंडा फडकविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अत्यंत प्रमेळ व कार्यकर्त्यांना नेहमी मार्गदर्शन करणारा नेता हरपला याचे अत्यंत दुख: होत आहे. कधीही फोनवाचवि केला तर लगेच उचलणारे ते अहंम नसलेले नेते होते. माझ्या एका कार्यकर्त्याला ‘हिमोफेलीया’ आजार होता. त्याच्यावर उपचार महागडे होते. मी बापटसाहेबांना विनंती केल्यावर त्यांनी ससून रुग्णालयामार्फत संपर्क मुंबईतील केईम रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली व एक कोटी २० लाख रुपयांचे बिल माफ केले.

- संदिप वाघेरे, माजी नगरेसवक, भाजप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT