Dr Sanket Deshmukh Sakal
पिंपरी-चिंचवड

मराठमोळ्या प्राध्यापकाचा अमेरिकेत गौरव

निगडी परिसरात लहानाचा मोठा झालेला आणि मराठीतून शिक्षण घेणारा एक विद्यार्थी कष्टाच्या जोरावर अमेरिकेत प्राध्यापक बनतो.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - निगडी परिसरात लहानाचा मोठा झालेला आणि मराठीतून शिक्षण (Education) घेणारा एक विद्यार्थी (Student) कष्टाच्या जोरावर अमेरिकेत (America) प्राध्यापक (Professor) बनतो. डेटा सायन्स, मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धीमत्ता अशा विषयांना शिक्षणाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. सैद्धांतिक संशोधन आणि शाळाबाह्य उपक्रमांनी शिक्षणाला नवा आयाम प्राप्त करून देण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या या नाविण्यपूर्णतेची दखल घेत नॅशनल सायन्स फाउंडेशनने पाच लाख डॉलरच्या करिअर अवॉर्डने त्यांना सन्मानित (Honor) केले आहे. शिक्षण क्षेत्रातील हा उपक्रमशील प्राध्यापक म्हणजे डॉ. संकेत देशमुख ! (Glory of a Professor of Marathi in America)

अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक येथे रसायन अभियांत्रिकी विषयात प्राध्यापक असलेले डॉ. देशमुख पॉलिमर संबंधित सैद्धांतिक संशोधन करत आहे. मल्टीस्केल मॉडेलिंग, मशिन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा सर्वसमावेशक (इंटीग्रेटेड) वापरातून नवीन पद्धती विकसित करत आहे. याचा उपयोग पॉलिमर आणि हायब्रीड मटेरिअल्सवर संशोधनासाठी होतो. ज्याचा थेट फायदा ऊर्जा, जैव इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रात होणार आहे. डॉ. देशमुख यांची संशोधनातील नाविण्यता आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व करण्याची क्षमता पाहता, युवा प्राध्यापकांसाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला असून, पुरस्काराची रक्कम ही संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणार आहे.

दहावीपर्यंत निगडीच्या शिवभूमी विद्यालयात पुढे अकरावी-बारावी म्हाळसाकांत विद्यालयात पूर्ण करणारे डॉ. देशमुख यांनी रामकृष्ण मोरे महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले. तर वाडिया कॉलेजमधून पॉलिमर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुढे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून संशोधनाला सुरवात केली. तिथेच डॉ. भास्कर इडगे यांच्या मार्गदर्शनाने त्यांचा पुढचा मार्ग प्रशस्त झाला. ‘कंप्युटेशनल मॉडेलिंग ऑफ सॉफ्ट मटेरिअल्स’या विषयात त्यांनी आयर्लंडमध्ये पीएचडी पूर्ण केली आहे.

लहान भावाने भरले शुल्क

वडील अविनाश देशमुख बजाज टेंपोमध्ये नोकरी करत तर आई पल्लवी देशमुख या गृहिणी आहे. संघर्षाच्या काळात विनायक आराध्ये या मामांसह मित्रपरिवार, नातेवाईक आणि पत्नी डॉ. अम्साराणी रामामूर्ती यांनी आधार दिला. तर एकदा पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळी पुरेसे पैसे नसल्याने नुकताच कमवायला लागलेल्या सचिन या लहान भावाने शैक्षणिक शुल्क भरल्याची आठवण डॉ. देशमुख सांगतात. शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण कष्ट, सकारात्मक ऊर्जेवर आजवरचा प्रवास झाल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

आत्मविश्वास, सातत्य, परिश्रम हे शब्द गुळगुळीत झाल्यासारखे वाटत असले, तरी तेच सत्य आहे. यशाचा मार्ग यांच्या प्रत्यक्ष अनुभुतीतूनच प्रशस्त होतो. घेतलेला निर्णय किंवा निवडलेल्या मार्गात शंभर टक्के प्रयत्न केले की मिळालेल्या संधीचं सोनं होत.

- डॉ. संकेत देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT