Google Form Sakal
पिंपरी-चिंचवड

दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आता गुगल फॉर्म

दहावी - बारावी परीक्षेच्या आयोजनासाठी सध्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतची गुगल फॉर्मवर माहिती सादर करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने केल्या आहेत.

आशा साळवी

दहावी - बारावी परीक्षेच्या आयोजनासाठी सध्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतची गुगल फॉर्मवर माहिती सादर करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने केल्या आहेत.

पिंपरी - दहावी - बारावी परीक्षेच्या (SSC-HSC Exam) आयोजनासाठी सध्या शाळांमधून (School) विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतची (Student Vaccination) गुगल फॉर्मवर (Google Form) माहिती (Information) सादर करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने केल्या आहेत. परिणामी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक डोस (Dose) घेतला आहे का? एकूण विद्यार्थी किती ? लस घेतलेले विद्यार्थी संख्या किती? असा ‘दैनिक प्रगती अहवाल’ शाळा तयार करू लागल्या आहेत. गुगल फॉर्मवर माहिती भरण्यास २९ जानेवारीपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तयारीसह फॉर्म भरण्याचे अतिरिक्त काम शिक्षकांच्या खाद्यांवर पडले आहे.

शहरात विविध माध्यम आणि बोर्डाच्या ६५८ शाळा आहेत. यामधून पहिली ते बारावीच्या ३ लाख ५३ हजार ६७८च्या आसपास विद्यार्थी संख्या आहे. त्यात दहावी व बारावीचे सुमारे ४२ हजार विद्यार्थी आहेत. दहावी, बारावीच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा १४ आणि ५ मार्चपासून सुरू आहेत. शिवाय त्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आवश्यक असल्याने शिक्षण संचालनालयाकडून या सूचना दिल्या आहेत.

सद्य:स्थितीत १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण सुरू असून, यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. शाळांकडून आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आले आहेत. ही माहिती सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमाच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी भरायची असून, दररोज अद्ययावत करायची आहे. त्यात विद्यालयाचे नाव, त्यांचा युडायस कोड, दहावीतील एकूण विद्यार्थी, त्यापैकी लस घेतलेले विद्यार्थी संख्या, बारावीतील एकूण विद्यार्थी व लस घेतलेले विद्यार्थी संख्या घ्यायची आहे.

दहावी व बारावी वगळून उर्वरित १५ते १८ वयोगटातील एकूण विद्यार्थी संख्या त्यात सादर करण्यास सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावी, बारावीच्या विद्यार्थी लसीकरणाचा अहवाल संचालनालयाला सादर करण्याच्या सूचनाही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी केल्या आहेत. मात्र दहावी - बारावीचे विद्यार्थी सद्य:स्थितीत प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. मुलांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास सांगितल्यास अनेक विद्यार्थी व पालक टाळाटाळ करीत असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे अतिरिक्त कामाच्या ताण वाढल्यामुळे शिक्षकवर्ग त्रासल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनी अभ्यास करावा, आंदोलनाच्या भानगडीत पडू नये! मोदींना अपशब्द बोलणाऱ्या तरुणीची आई काय म्हणाली? पाहा Video

Indonesia Ferry Fire: इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग! ५ जणांचा मृत्यू, ४१ बेपत्ता, शोध सुरू, कशी घडली घटना?

Latest Marathi News Live Update : 'मुंबई कोस्टल रोड नॉर्थ' प्रकल्पाची पाहणी केली

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT