paus.jpg 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी एक नंतर जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. कारण, सकाळपासून कडक ऊन होते. साधारणतः बारानंतर ढग दाटून आले आणि एकच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अधूनमधून ढगांचा गडगडाटही ऐकायला येत आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांची पाणी पातळीही कमी झालेली आहे. मुळा नदीवरील मुळशी धरण आणि पवना नदीवरील पवना धरणातून विसर्गही थांबविण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून उकडा जाणवत होता. ऊन व उकाडा यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. आज सकाळपासूनही असेच वातावरण होते. दुपारनंतर मात्र पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. 

पावसापासून बचाव करण्यासाठी पादचाऱ्यांनी दुकानांचा आसरा घेतला. दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेची झाडे, उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर व भुयारी मार्गांचा आसरा घेतला. काहींनी मात्र भिजण्याचा आनंद लुटत तशाच दुचाकी दामटल्या. सखल भागात पाणी साचल्यामुळे चिखल झाला होता. कामे सुरू असलेल्या ठिकाणी अधिक चिखल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. असे चित्र रुपीनगर निगडी, नवी सांगवी, भोसरी, चऱ्होली भागात बघायला मिळाले. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी चौक- मोरवाडी चौक- एम्पायर इस्टेट पूल या दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. पावसामुळे कामगारांनी काम थांबवून पिलरचा आसरा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: घसरणीनंतर बाजार तेजीत बंद! कोणते शेअर्स वाढले? बँकिंग शेअर्स घसरले; खरेदीची हीच वेळ?

लव्ह जिहादचे आरोप करणाऱ्या 'मिस इंडिया अर्थ' सायलीचं अपहरण, पुण्यात हिंदू धर्मात केलेलं शुद्धीकरण, आता अचानक झाली गायब

IPL 2026: अर्जुन तेंडुलकरचे परफेक्ट यॉर्कर्स; रिषभ पंतलाही फलंदाजी करताना दिला त्रास; पाहा Video

Latest Marathi News Live Update : माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Amazon Seller Growth: अ‍ॅमेझॉनच्या विक्रेता इकोसिस्टमला महाराष्ट्राचा मजबूत हातभार; फॅशन-ब्युटी-होम उत्पादनांतून लघुउद्योजकांची झपाट्याने भरारी

SCROLL FOR NEXT