Ajit Pawar sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi News : अजित पवार यांचा पुनावळेकरांना दिलासा? कचरा डेपोवर तोडगा काढण्याचे दिले आश्वासन

पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी मी पुनावळेकर ही मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोबाबत स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाचे मत आणि म्हणणे जाणून घेतले आहे. आता महापालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेतल्यानंतरच कचरा डेपोवर काय तो तोडगा काढू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बुधवारी (ता. २३) दिल्याने पुनावळेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी मी पुनावळेकर ही मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली नागरिकांची बाजू मांडत निवेदनही दिले. यावेळी मोठ्या संख्येने पुनावळे ग्रामस्थ व सोसायटी प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिका विकास आराखड्यानुसार पुनावळेतील मोकळ्या जागेत कचरा डेपोचे आरक्षण आहे. परंतु, सध्या सभोवताली अनेक मोठे गृहप्रकल्प निर्माण झाले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे वास्तव्यास आल्याने प्रचंड लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे डेपोला नागरिकांनी तीव्र विरोध आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुनावळेत कचरा डेपा सुरू करण्याबाबत प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या भागातील सुमारे ३० हजार नागरिक चिंतेत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत. सदनिकाधारक नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हिंजवडी आयटी हबला लागूनच हा डेपो निर्माण होणार असल्यामुळे आयटी आणि उच्चशिक्षित लोकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नाराजाचीचा सूर आहे.

आरक्षण स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

कचरा डेपो ही गरज आहे त्यामुळे तो रद्द करण्याऐवजी ज्या ठिकाणी भविष्यात गृहप्रकल्प होणार नाहीत अशा शासकीय जागेत कायदेशीर बाबींच्याआधारे आरक्षण स्थलांतरीत करण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी तशी जागा आम्ही सूचवू अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

याबाबत शुक्रवारी (ता. २५) महापालिका आयुक्त शेखर सिंह, व सोसायटी धारकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करू आणि दोन्ही बाजू ऐकून तोडगा काढू असे आश्वासन पवार यांनी दिल्याने आज होणाऱ्या बैठकीकडे पुनावळेकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: विराट कोहलीने खरंच 'पाकिस्तान'च्या झेंड्यावर ऑटोग्राफ दिला का? सत्य जाणून बसेल धक्का अन् ओठांवर येतील शिव्या...

Kolhapur Police Action : ...आता कोल्हापूर पोलिसांची सटकली, मारहाण करणाऱ्या गुंडांना कान धरून रस्त्यावर फिरवले

Latest Marathi News Live Update : पनवेल महानगरपालिकची “स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी” मोहीम

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपरची पहिली झलक आली समोर; पाहा प्रीमियम एसी कोच कसा असेल

Diwali 2025 Diabetes Management Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहींसाठी फॉलो कराव्या 'या' स्मार्ट टिप्स

SCROLL FOR NEXT